JOIN US
मराठी बातम्या / ऑटो अँड टेक / टाटा, महिंद्रांच्या SUV ना कडवी टक्कर, लाँच होण्याआधीच 13 हजार SUV बूक

टाटा, महिंद्रांच्या SUV ना कडवी टक्कर, लाँच होण्याआधीच 13 हजार SUV बूक

या बुकिंगमध्ये K-Code प्रोग्रामद्वारे केलेल्या 1 हजार 973 रिझर्व्हेशन्सचा देखील समावेश आहे.

जाहिरात

कार

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 17 जुलै : दक्षिण कोरियातील बहुराष्ट्रीय ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी असलेली ‘किया’ ही लक्झुरिअस गाड्यांच्या निर्मितीसाठी ओळखली जाते. कंपनीनं तयार केलेल्या अनेक गाड्या भारतीय ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या आहेत. कंपनीनं आता आपली 2023 सेल्टोस फेसलिफ्ट ही गाडी भारतीय बाजारपेठेत उतरवण्याची घोषणा केली असून, बुकिंगलादेखील सुरुवात झाली आहे. किया इंडियानं दिलेल्या माहितीनुसार, बुकिंग सुरू झाल्याच्या पहिल्या दिवशी 13 हजार 424 गाड्यांचं बुकिंग झालं आहे. या बुकिंगमध्ये K-Code प्रोग्रामद्वारे केलेल्या 1 हजार 973 रिझर्व्हेशन्सचा देखील समावेश आहे. ज्या माध्यमातून, ज्यांच्याकडे सध्या सेल्टोस मॉडेल आहे त्यांना प्राधान्यानं नवीन सेल्टोस मॉडेल मिळेल. ‘ओव्हर ड्राईव्ह’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

किया इंडियानं दिलेल्या माहितीनुसार, बुकिंग सुरू झाल्याच्या पहिल्या दिवशी 13 हजार 424 गाड्यांचं बुकिंग झालं आहे. या बुकिंगमध्ये K-Code प्रोग्रामद्वारे केलेल्या 1 हजार 973 रिझर्व्हेशन्सचा देखील समावेश आहे. ज्या माध्यमातून, ज्यांच्याकडे सध्या सेल्टोस मॉडेल आहे त्यांना प्राधान्यानं नवीन सेल्टोस मॉडेल मिळेल. ‘ओव्हर ड्राईव्ह’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

2023 सेल्टोस फेसलिफ्टचं येत्या आठवड्यात लाँचिंग होण्याची शक्यता आहे. 14 जुलै 2023 रोजी 25 हजार रुपयांच्या टोकन रकमेवर या एसयूव्ही गाडीचं बुकिंग सुरू करण्यात आलं होतं. उल्लेखनीय म्हणजे, आतापर्यंत देशभरात किया ब्रँडच्या विक्री झालेल्या पाच लाखांहून अधिक गाड्यांमध्ये सेल्टोसचा सुमारे 50 टक्के वाटा आहे.

सेल्टोस फेसलिफ्ट ही कार, 10.25-इंच ड्युअल डिस्प्ले सेटअप, पॅनोरॅमिक सनरूफ, ड्युअल-झोन टेम्परेचर कंट्रोल, एट-वे पावर्ड ड्राइव्ह सीट आणि ऑटो होल्डसह इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक यासारख्या असंख्य फीसर्सनं सुसज्ज आहे. या एसयूव्हीमध्ये अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टिम (ADAS) आहे. ज्यामध्ये 17 फंक्शन्सचा समावेश आहे. या शिवाय या कारमध्ये 15 स्टँडर्ड सेफ्टी फीचर्ससह एकूण 32 सेफ्टी फीचर्स आहेत.

किया सेल्टोस फेसलिफ्टमध्ये एक नवीन 1.5-लिटर क्षमतेचं आणि चार-सिलिंडर असलेलं टर्बो-पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 160PS आणि 253Nm टॉर्क तयार करतं. या नव्या सेल्टोसमध्ये 1.5 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे. ह्युंडाई अल्काझार आणि व्हर्ना यांच्याबरोबर लाँच झालेल्या किया कारेन्स, ज्यात 1.4 लिटरचं टर्बो पेट्रोल इंजिन होतं तिचा पर्याय म्हणून ही गाडी लाँच केली आहे.

इतकंच नाही तर या एसयूव्हीला 1.5-लिटर, इनलाइन फोर-सिलिंडर, 115PS/143.8Nm सह नॅचरली अॅस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आणि 1.5-लिटर, इनलाइन फोर-सिलेंडर, 116PS/250Nm सह टर्बो-डिझेल मोटर मिळत आहे. या गाडीमध्ये सिक्स-स्पीड iMT, ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक, टॉर्क-कन्व्हर्टर ऑटोमॅटिक, सिक्स-स्पीड मॅन्युअल आणि सीव्हीटी ऑटोमॅटिक असे विविध ट्रान्समिशन पर्याय ऑफर करण्यात आलेले आहेत.

सेलटोस फेसलिफ्ट ही टेक लाईन, जीटी लाईन आणि एक्स लाईन या तीन प्राथमिक ट्रिम्स अंतर्गत HTE, HTK Plus, HTX, HTX Plus, GTX Plus आणि X Line या सहा व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. ही गाडी आठ मोनो-टोन आणि दोन ड्युएल-टोन कलर पर्याय ऑफर करते. स्पार्कलिंग सिल्व्हर, इंटेन्स रेड, प्युटर ऑलिव्हर, इम्पिरियल ब्लू, ग्रॅव्हिटी ग्रे, क्लिअर व्हाइट, ग्लेशियर व्हाइट, अरोरा ब्लॅक पर्ल या मोनो-टोनमध्ये उपलब्ध आहे. तर, ड्युअल-टोनमध्ये ग्लेशियर व्हाईट पर्ल आणि अरोरा ब्लॅक पर्ल, इंटेन्स रेड आणि अरोरा ब्लॅक पर्ल हे दोन पर्याय उपलब्ध आहेत. मॅट ग्रॅफाइट पेंट जॉब केवळ X लाइन ट्रिमसाठी उपलब्ध आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या