JOIN US
मराठी बातम्या / ऑटो अँड टेक / टाटा मोटर्सची जबरदस्‍त ऑफर, कारवर मिळेल 60,000 रुपयांपर्यंत सूट!

टाटा मोटर्सची जबरदस्‍त ऑफर, कारवर मिळेल 60,000 रुपयांपर्यंत सूट!

टाटाची शानदार एसयुव्ही टाटा हॅरियर (Tata Harrier) वर सर्वात जास्त 60,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट देण्यात आला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 30 जून : लॉकडाउनच्या काळात देशभरातील बाजारपेठा बंद असल्यामुळे जवळपास सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. ऑटो इंडस्ट्रीलाही याचा मोठा फटका बसला होता. कार उत्पादक कंपन्यांनी जो स्टॉक बाजारात उतरवला होता, तो गाड्यांची विक्री होऊ शकली नाही. त्यामुळे टाटा मोटर्स (Tata Motors) ने स्टॉक पूर्ण करण्यासाठी खास ऑफर दिली आहे. टाटा मोटर्सने आपल्या कारवर 60 हजार रुपयांपर्यंत सूट दिली आहे. ही ऑफर फक्त 30 जूनपर्यंत उपलब्ध आहे. आपण जर कोरोना वॉरिअर असाल तर तुम्हाला  5,000 रुपयांपर्यंत सूट देण्यात आली आहे. टाटा टियागो (Tata Tiago) वर 25 हजार रुपयापर्यंत डिस्काऊंट मिळणार आहे. यात 15 हजार रुपये कॅश डिस्काउंट आणि 10 हजार रुपये एक्सचेंज बोनस सुद्धा ऑफर देण्यात आली आहे. तर टाटा ग्रुपचे कर्मचारी आणि वेंडर्स असाल तर 10,000 रुपये अतिरिक्‍त डिस्‍काउंट देण्यात येत आहे. या गावात आहे Royal Enfield Bullet चे मंदिर, खरी कहाणी वाचाल तर अंगावर येईल काटा! जर तुम्ही कोविड-19 कर्मचारी असाल तर तुम्हाला 5,000 रुपये अतिरिक्‍त कॅश डिस्‍काउंट मिळेल. टाटा टियागोची किंमत ही 4.60 लाखांपासून सुरू होते. टाटाची शानदार एसयुव्ही टाटा हॅरियर (Tata Harrier) वर सर्वात जास्त 60,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट देण्यात आला आहे. यात 30,000 रुपये कॅश डिस्‍काउंट आणि 30 हजार रुपये एक्सचेंज बोनस दिले आहे. टाटा हॅरियरची किंमतही 13.69 लाखांपासून सुरू होते. टाटाच्या कर्मचाऱ्यांना 15,000 रुपयांपर्यंत डिस्‍काउंट देण्यात आला आहे. टाटाची सेडान कार टिगोर (Tata Tigor) वर 40 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट देण्यात आला आहे.  यात 20 हजार कॅश डिस्कांउट आणि 20 हजार रुपये एक्सचेंज बोनस (Exchange Bonus) देण्यात आला आहे. टाटा ग्रुपच्या कर्मचाऱ्यांना 10,000 रुपये अतिरिक्‍त सूट देण्यात आली आहे. ही ऑफर फक्त पेट्रोल इंजिनमध्ये उपलब्ध आहे. संपादन - सचिन साळवे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या