नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर : कॅब सर्विस प्रोव्हाइडर कंपनी Ola ने इलेक्ट्रिक मॉबिलिटी स्पेसमध्ये Electric Scooter लाँच केली आहे. 15 ऑगस्ट रोजी स्कूटर लाँच झाल्यानंतर देशात इ-स्कूटरची क्रेझ आहे. कंपनी दिवाळीनंतर आता OLA S1 आणि S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटर टेस्ट राइड देण्यासाठी तयार आहे. कंपनीचे CEO भाविश अग्रवाल यांनी ई-स्कूटर फॅक्ट्रीमध्ये बनण्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. आमच्या फ्यूचर फॅक्ट्रीमध्ये महिला अतिशय मोठ्या प्रमाणात ई-स्कूटरचं प्रोडक्शन करत असल्याचं OLA चे CEO भाविश अग्रवाल यांनी मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे. Ola Electric ने आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरचे दोन वेरिएंट S1 आणि S1 Pro भारतीय बाजारात 15 ऑगस्ट रोजी एक लाख रुपयांच्या सुरुवाती किंमतीत लाँच केली. Ola Scooter ने केवळ दोन दिवसांत 1100 कोटी रुपयांचा ऑनलाइन ट्रेड केला होता.
10 नोव्हेंबरपासून सुरू होणार टेस्ट ड्राइव्ह - ओला इलेक्ट्रिकने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांना 10 नोव्हेंबरपासून Ola E-Scooter टेस्ट ड्राइव्हसाठी देण्याची योजना आखत आहेत. E-Scooter S1 साठी बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना कंपनी टेस्ट ड्राइव्हनंतरच संपूर्ण पेमेंट करण्याचं सांगणार आहे. Ola ने टेस्ट ड्राइव्हनंतरच ग्राहकांना पेमेंट करण्याचा पर्याय दिला आहे. यात बुकिंग केलेल्या वाहनांच्या डिलीव्हरीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
Ola Electric ने स्कूटरच्या डिलीव्हरीबाबत बोलताना सांगितलं, की बुकिंग करणाऱ्या सर्व ग्राहकांना स्पेसिफिक डिलीव्हरी विंडो देण्यात आली आहे आणि आम्ही या विंडोअंतर्गतच डिलीव्हरी करण्यासाठी योग्य त्या योजना आखल्या आहेत.
दरम्यान, स्कूटर खरेदी करण्यासाठी फायनान्सची गरज असल्यास, ओला फायनेंशियल सर्विसेजने S1 स्कूटरला फायनान्स करण्यासाठी, मदतीसाठी IDFC Bank, HDFC Bank, TATA Capital सह प्रमुख बँकांसह करार केला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रिक स्कूटरच्या अॅडव्हान्स वर्जन S1 Pro साठी EMI 3199 रुपयांपासून सुरू होणार आहे. HDFC बँक ओला आणि ओला इलेक्ट्रिक अॅपवर ग्राहकांना काही मिनिटांत प्री-अप्रूव्ड ऑटो लोन (Pre-Approved Auto Loan) उपलब्ध करुन देईल. देशातील चार राज्य इलेक्ट्रिक वाहनावर आणखी वेगळी सबसिडी देत आहेत. दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान राज्यातील लोकांना सबसिडीचा फायदा मिळू शकतो.