JOIN US
मराठी बातम्या / ऑटो अँड टेक / Jioची अनोखी स्कीम; आता आपल्या जन्मतारखेचा करा मोबाईल नंबरमध्ये समावेश

Jioची अनोखी स्कीम; आता आपल्या जन्मतारखेचा करा मोबाईल नंबरमध्ये समावेश

ग्राहकांना जिओची ही योजना खूपच आवडत आहे. तुम्हालाही तुमचा आवडता मोबाईल नंबर मिळवायचा असेल तर खालील बाबी माहीत असणं गरजेचं आहे.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 जुलै : टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी सतत काहीनाकाही नवीन ऑफर आणि स्कीम्स देण्याचा प्रयत्न करत असतात. सध्या भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओनं आपल्या ग्राहकांसाठी आकर्षक स्कीम आणली आहे. या अंतर्गत तुम्ही तुमच्या आवडीचा मोबाईल नंबर घेऊ शकता. तुम्ही तुमचा लकी नंबर किंवा जन्मतारखेचासुद्धा तुमच्या मोबाईल नंJioची अनोखी स्कीम; आता आपल्या जन्मतारखेचा करा मोबाईल नंबरमध्ये समावेशबरमध्ये समावेश करू शकता. मोबाईल क्रमांक 10 अंकी असतो, त्यापैकी शेवटचे चार ते सहा आकडे तुम्ही स्वतः निवडू शकता. ग्राहकांना जिओची ही योजना खूपच आवडत आहे. तुम्हालाही तुमचा आवडता मोबाईल नंबर मिळवायचा असेल तर खालील बाबी माहीत असणं गरजेचं आहे. आवडीच्या क्रमांकासाठी द्यावे लागतील पैसे जिओच्या या स्कीमचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला फक्त एकदाच 499 रुपये भरावे लागतील. जिओची ही ऑफर पोस्टपेड आणि प्रीपेड दोन्ही वापरकर्त्यांसाठी आहे. कोणत्याही वापरकर्त्याकडून 499 पेक्षा जास्त पैसे आकारले जाणार नाहीत. पैसे दिल्यानंतर वापरकर्ते त्यांच्या मोबाइल नंबरचा पसंतीचा क्रम निवडू शकतात. या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील - जिओच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी https://www.jio.com/selfcare/choice-number/ या वेबसाइटला भेट द्या. तिथे सेल्फ केअर सेक्शनमध्ये जा. या शिवाय तुम्ही फोनमध्ये MyJio अॅप डाउनलोड करूनही सेल्फ केअर सेक्शनमध्ये जाऊ शकता. - त्यानंतर मोबाईल नंबर सिलेक्शन सेक्शनमध्ये जावं लागेल. - तिथे तुम्ही तुमचा सध्याचा मोबाईल नंबर टाका. त्यानंतर ओटीपी पद्धतीने तुमचा नंबर व्हेरिफाय करा. - त्यानंतर तुम्हाला नवीन नंबर निवडण्याचा ऑप्शन मिळेल. - या ऑप्शनमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोबाईल नंबरचे शेवटचे चार ते सहा अंक निवडू शकाल. - आवडीचा मोबाइल नंबर निवडल्यानंतर पेमेंट ऑप्शनवर जा. तिथे तुम्हाला 499 रुपये द्यावे लागतील. - पेमेंट केल्यानंतर सुमारे 24 तासांनंतर नवीन मोबाइल नंबर अॅक्टिव्ह होईल. काही महिन्यांपूर्वीच रिलायन्सनं 5G नेटवर्कबद्दल एक मोठी घोषणा केली होती. 2023 मध्ये देशातील प्रत्येक शहर आणि गावात जिओ 5G नेटवर्क सुविधा उपलब्ध होईल, अशीही घोषणा होती. त्यात आता या नवीन स्कीमचीही भर पडली आहे. ग्राहकांना आपल्या आवडीचा मोबाईल नंबर निवडता येत असल्यामुळे, रिलायन्स जिओला ते प्राधान्य देत आहेत. याचा कंपनीला फायदा होईल, असं म्हटलं जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या