JOIN US
मराठी बातम्या / ऑटो अँड टेक / आता कार घेणे महागले! देशातील सर्वात मोठ्या कंपनीने वाढवल्या वाहनांच्या किंमती

आता कार घेणे महागले! देशातील सर्वात मोठ्या कंपनीने वाढवल्या वाहनांच्या किंमती

देशातील सर्वात मोठी निर्माता कंपनी मारुती सुझुकीने आजपासून आपल्या वाहनांच्या किंमतींमध्ये वाढ केली आहे. यामुळे आता कार घेणाऱ्यांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 16 जानेवारी नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात देशातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनीने ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. मारुती सुझुकीने आजपासून आपल्या वाहनांच्या किंमतींमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. आज सोमवारपासून म्हणजेच 16 जानेवारी 2023 पासून कंपनीने आपल्या सर्व एसयूव्ही मॉडेल्सच्या किंमतीमध्ये वाढ केली आहे. सर्व मॉडलच्या एक्स शोरुम किंमतींमध्ये जवळपास 1.1 टक्क्यांनी वाढवण्यात आल्या आहेत.  विविध मॉडल्सच्या हिशोबाने ही दर वाढ लागू होणार आहे. कोणत्या मॉडलमध्ये किती रुपयांनी वाढ होणार याविषयी अद्याप मारुती सुझुकीने कोणतीही माहिती दिलेली नाही. विविध मॉडलनुसार त्यांच्या किंमती ठरणार आहेत. कंपनीच्या व्हिकल लाइनअपमध्ये सध्या सर्वात स्वस्त ऑल्टोपासून ते ग्रँड विटारा सारख्या वाहनांचा देखील समावेश आहे. मारुती सुझुकीसोबत टाटा मोटर्स, हुंदई, ऑडी आणि मर्सिडीज बेंज सारख्या ब्रांड्सने देखील जानेवारीपासून आपल्या वाहनांच्या किंमतींमध्ये वाढ करण्याची योजना आखली आहे.

Auto Expo : भारतीय बनावटीची ई-स्कूटर, जगातली पहिली ऑटो-बॅलन्सिंग बाइक; वाचा फिचर्स

वाहनांच्या किंमती वाढण्याचे कारण काय?

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वच वाहन निर्माता कंपन्या आपल्या वाहनांमध्ये वाढ करत असल्याचे दिसत आहे. इनपुट कॉस्टमध्ये वाढ होत असल्यामुळे या किंमती वाढवल्या जात असल्याचे कंपन्यांकडून सांगितले जात आहे. प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वच वाहन उत्पादक कंपन्या या आपल्या वाहनांच्या किंमतीमध्ये वाढ करत असतात.

या कारचं मॉडेल पाहून तुम्ही नक्की प्रेमात पडाल, सुपरकूल कारची किंमत आणि फीचर्स काय आहेत पाहा

संबंधित बातम्या

 चालू आर्थिक वर्षात दुसऱ्यांदा वाढ

चालू आर्थिक वर्षात मारुती सुझुकी कंपनीने दुसऱ्यांदा किमतीत वाढ केली आहे. यापूर्वी एप्रिल 2022 मध्ये वाहनांच्या किमतीत वाढ करण्यात आली होती. वाढत्या किमतीचा परिणाम कमी करण्यासाठी मारुती सुझुकीने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आपल्या वाहनांच्या किमती वाढवणार असल्याचे सांगितले होते. यानंतर आजपासून वाहनांच्या किंमतींमध्ये वाढ करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी कंपनीच्या विक्रीत झाली घट

डिसेंबर 2022 मध्ये मारुती सुझुकी इंडियाच्या घाऊक विक्रीत एका वर्षापूर्वीच्या याच महिन्याच्या तुलनेत 9% ची घट झाली होती. यादरम्यान, मारुतीने डीलर्सना एकूण 1,39,347 वाहनं पाठवलेली होती. तर 2021 मध्ये याच महिन्यात कंपनीने एकूण 1,53,149 वाहनांची विक्री केली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या