JOIN US
मराठी बातम्या / ऑटो अँड टेक / मारुती कंपनीने परत मागवल्या 17 हजार गाड्या, तुमची तर नाही? आताच चेक करा

मारुती कंपनीने परत मागवल्या 17 हजार गाड्या, तुमची तर नाही? आताच चेक करा

तुमच्याकडे आहे का Maruti कार? मग ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची कारण…

जाहिरात

मारुती सुझुकी

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : इतर कंपन्यांच्या तुलनेत मारुती कंपनीच्या गाड्यांची खरेदी भारतात जास्त केली जाते. पहिल्यापासून मारुती कंपन्याच्या गाड्या घेणारे अनेक जण आहेत. तुमच्या घरातही मारुती कार असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. मारुती सुझुकीने आपल्या 4 मॉडेलच्या 9125 गाड्या परत मागवल्या आहेत. तांत्रिक अडचणींमुळे कंपनी ऑल्टो के 10 सह ५ मॉडेल्स परत मागवत आहे. 8 डिसेंबर 2022 ते 12 जानेवारी 2023 या कालावधीत जे मॉडेल्स तयार करण्यात आले ते परत मागवले आहेत. एअर बॅगमध्ये बिघाड झाल्याने त्या परत मागवण्याचा निर्णय घेतला आहे. CNBC आवाजने दिलेल्या वृत्तानुसार काही त्रुटींमुळे कंपन्या रिकॉलदरम्यान विशिष्ट वेळी बनवलेल्या गाड्या परत मागवतात. यानंतर ते ग्राहकांकडून विनामूल्य ते दुरुस्त करतात. वर्कशॉप ग्राहकांशी स्वत: संपर्क साधून त्यांना माहिती देते, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.

या कारचं मॉडेल पाहून तुम्ही नक्की प्रेमात पडाल, सुपरकूल कारची किंमत आणि फीचर्स काय आहेत पाहा

कंपनीने का मागवल्या कार सहसा कंपनी कोणतीही कार उत्पादन करताना त्यात कोणती कमतरता नंतर जाणवली तर त्या कारचं मॉडेल परत मागवतात. यामुळे ग्राहकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने आणि ग्राहकांचा विचार करुन कंपनी कार परत मागवते. आता आपल्या कारमधील बिघाड विनाशुल्क दुरुस्त करणे, त्यातील पार्ट चेक करणं, बदलणं किंवा ग्राहकांना काही फॉल्ट असेल तर पैसे परत देणे ही कंपन्यांची जबाबदारी आहे. एअर बॅगमध्ये बिघाड झाल्याने परत बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

थारला टक्कर देणार मारुती Jimny! काय आहेत फीचर्स पाहा PHOTO

संबंधित बातम्या

कंपनीने एकूण 17 हजार 362 वाहने परत मागवली आहेत. अल्टो के 10, एस-प्रेसोच्या काही मॉडेल्सचाही यात समावेश आहे. ब्रेझ्झा, बलेनोचीही काही मॉडेल्स आहेत. ग्रँड विटारा, एस-प्रेसोच्या काही मॉडेल्सचाही यात समावेश आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या