नवी दिल्ली, 11 जानेवारी : इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ दिवसेंदिवस वाढते आहे. नव्या वर्षात इलेक्ट्रिक वाहन खरेदीचा विचार करत असाल, तर सरकारकडून सबसिडी दिली जात आहे. केंद्र आणि राज्य सरकारने देशात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी फेम-2 सबसिडी योजना सुरू केली आहे. या योजनेत सरकारकडून इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्यांना सबसिडी दिली जाते. देशात महाराष्ट्र सरकारकडून इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर सर्वाधिक 2.5 लाख रुपयांपर्यंत सबसिडी दिली जात आहे. सबसिडीसाठी 31 डिसेंबर 2021 शेवटची तारीख होती. परंतु सरकारने या योजनेची तारीख 31 मार्च 2022 पर्यंत वाढवली आहे. महाराष्ट्र राज्यात इलेक्ट्रिक वाहन खरेदी केल्यास सर्वाधिक 2.5 लाख रुपयांपर्यंतची सबसिडी मिळू शकते.
या कार्सवर मिळेल 2.5 लाख रुपयांची सबसिडी - महाराष्ट्र सरकारकडून दोन कार्सवर 2.5 रुपयांची सबसिडी मिळते आहे. यात टाटा टिगोर आणि टाटा नेक्सॉन ईवी सामिस आहे. देशातही इतरही इलेक्ट्रिक कार्स उपलब्ध आहेत. परंतु त्यावर कोणतीही सबसिडी देण्यात येत नाही. जर तुम्ही 31 मार्चपर्यंत महाराष्ट्रातील कोणत्याही शहरात Tata Tigor आणि Tata Nexon EV खरेदी करत असाल, तर 2.5 लाख रुपयांची बचत होऊ शकते.
महाराष्ट्र सरकारने 10 हजार इलेक्ट्रिक वाहनांवर 1.5 लाख रुपयांपर्यंतचा इन्सेंटिव्ह प्लॅन ठेवला आहे. 1 हजार इलेक्ट्रिक बसेसवर 20 लाखांपर्यंत इन्सेंटिव्ह आणि हा फायदा केवळ सरकारी उपक्रमांसाठीच्या बसेससाठी असेल. 2025 पर्यंत सरकारी बसेसच्या ताफ्यात 25 टक्के इलेक्ट्रिक बस करण्याची योजना आहे.