JOIN US
मराठी बातम्या / ऑटो अँड टेक / महत्त्वाच्या खात्यांचे पासवर्ड Passwords विसरता? मग घ्या Googleची मदत, कायमची संपेल समस्या

महत्त्वाच्या खात्यांचे पासवर्ड Passwords विसरता? मग घ्या Googleची मदत, कायमची संपेल समस्या

Password Manager: तुम्ही पासवर्ड लक्षात ठेवायला विसरता का? जर असं असेल तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. आज आम्ही पासवर्ड लक्षात ठेवण्याच्या तुमच्या समस्येचे निराकरण करणार आहोत. अँड्रॉइड फोनमध्ये पासवर्ड कसा सेव्ह करायचा, हे आज आपण जाणून घेणार होतो.

जाहिरात

महत्त्वाच्या खात्यांचे पासवर्ड Passwords विसरता? मग घ्या Googleची मदत, कायमची संपेल समस्या

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 जून :  आपण अनेक कामं ऑनलाईन करतो. बँकांचे व्यवहार, सोशल मीडियाचा वापर, ऑफिसचं काम किंवा इतर गोष्टी करत असताना आपल्याला अनेक पासवर्ड लक्षात ठेवावे लागतात. फक्त सोशल मीडियाचा विचार करायचा झाला तर फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम किंवा अशा अनेक साईट्सवर आपण असतो. या प्रत्येक ठिकाणी तुमचा वेगळा पासवर्ड असतो. याशिवाय तुमचा पर्सनल इमेल आयडीचा पासवर्ड, बँक खात्याचा पासवर्ड, यूपीआयचा पासवर्ड असे कित्येक पासवर्ड आपल्याला स्मरणात ठेवावे लागतात. परंतु अनेक जण हे पासवर्ड वारंवार विसरतात. तुम्हीही पासवर्ड (Password) लक्षात ठेवायला विसरता का? जर असं असेल तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. आज आम्ही पासवर्ड लक्षात ठेवण्याच्या तुमच्या समस्येचे निराकरण करणार आहोत. पासवर्ड मॅनेजर्स तुमचे सर्व पासवर्ड ट्रॅक करतात. शिवाय, तुम्ही हे पासवर्ड कधीही पाहू शकता. याव्यतिरिक्त, बहुतेक वेबसाइटवर तुम्हाला पासवर्ड टाइप न करता साइन इन करण्याची परवानगी देतात. तुमच्याकडे Android फोन असल्यास आणि लिंक केलेले Google खाते असल्यास, तुम्ही Google चे पासवर्ड मॅनेजर (Password Manager) वापरू शकता. तुम्ही अँड्रॉईड फोनमध्ये (Android) पासवर्ड सेव्ह करून ते कसे शोधू शकता, हे आज आपण जाणून घेणार आहोत. पासवर्ड कसा शोधायचा?-

  1. सर्वप्रथम, तुमच्या Android फोनवर Google Chrome ब्राउझर सुरू करा आणि वरच्या उजव्या बाजूला असलेल्या तीन बिंदूंवर क्लिक करा. काही डिव्हाइसवर, हे 3 ठिपके तळाच्या कोपऱ्यात देखील असू शकतात.

  2. नंतर पॉप-अप मेनूमधील सेटिंग्ज (Settings) वर टॅप करा.हेही वाचा:  Twitter वापरकर्त्यांसाठी खूशखबर! लवकरच येणार ‘हे’ नवं फीचर

  3. आता तुम्हाला पुढील मेनूमध्ये पासवर्डवर (Password) टॅप करावे लागेल. येथे तुम्हाला तुमचा पासवर्ड किंवा फेस किंवा टच स्कॅन टाकावा लागेल.

  4. आता तुमच्यासमोर वेबसाइट्सची एक लांबलचक यादी दिसेल, ज्यामध्ये युजरनेम किंवा पासवर्ड सेव्ह केला जाईल. ज्या साइटसाठी तुम्हाला तुमचा पासवर्ड हवा आहे त्यावर टॅप करा, त्यानंतर पासवर्ड विचारण्यासाठी डोळ्याच्या (EYE) चिन्हावर टॅप करा.हेही वाचा:  Electric Vehicle: इलेक्ट्रिक वाहनाची बॅटरी लाईफ कशी वाढवावी? फॉलो करा ‘या’ टिप्स

  5. तुम्हाला हा पासवर्ड इतरत्र कॉपी आणि पेस्ट करायचा असल्यास (ईमेल किंवा नोटमध्ये), त्याच्या शेजारी दोन स्टॅक केलेल्या चौकोनी चिन्हावर टॅप करा. हे तुमच्या फोनच्या क्लिपबोर्डवर पासवर्ड कॉपी होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या