नवी दिल्ली, 7 नोव्हेंबर : नवी टू-व्हिलर खरेदी करायची आहे, पण बजेट नाहीये? अशात तुमच्यासाठी बजेटमध्ये एक चांगली संधी आहे. सध्या 75 हजारहून अधिक किंमत असलेली होंडा अॅक्टिव्हा केवळ 27 हजार रुपयांत खरेदी करता येईल. त्याशिवाय यात हप्त्यांचीही सुविधा उपलब्ध आहे. कंपनीकडून यावर वॉरंटीही मिळत आहे. Honda Activa 125 स्कूटर बाइक्स 24 नावाच्या वेबसाइटवर लिस्टेड आहे. या साइटवर केवळ 27000 रुपयांत ही गाडी खरेदी करता येईल. ही सेकंड हँड कॅटेगरी स्कूटर असून यात चांगले फीचर्सही देण्यात आले आहेत. लिस्टेड माहितीनुसार, या गाडीवर 12 महिन्यांची वॉरंटी आणि कॅशबॅकचा पर्याय आहे. Honda Activa 125 स्कूटर दिल्लीच्या DL-08 आरटीओमध्ये रजिस्टर्ड आहे. ही गाडी 13 हजार किलोमीटरपर्यंत चालली आहे. हे 2017 चं मॉडेल असून सेकंड ओनर स्कूटर आहे. याची डुप्लिकेट चावी देण्यात आलेली नाही. स्कूटरला 124 सीसी इंजिन देण्यात आलं आहे. ही गाडी एक लीटर पेट्रोलमध्ये 46.5 किलोमीटर मायलेज देते. याचं वजन 111 किलोग्रॅम आहे. यात 5.3 लीटरचा फ्लूल टँक असून 8.5 bhp पॉवर जनरेट करतो.
या Honda Activa 125 मध्ये काही अटींसह 12 महिन्यांची वॉरंटी आणि 7 दिवसांचा कॅशबॅक मिळतो. यात स्कूटर न आवडल्यास किंवा इतर काही समस्या आल्यास पैसे परत मिळू शकतात.
कोणतीही सेकंड हँड स्कूटर खरेदी करण्याआधी त्याबाबत माहिती घेणं गरजेचं आहे. स्कूटर खेरदी करण्याआधी ती चेक करुन घेणंही अत्यावश्यक आहे.