नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर : चारचाकी गाड्यांमध्ये एयरबॅगची सुविधा अनिवार्य करण्यात आली आहे. पण आता Four Wheelers सह Two Wheelers लादेखील एयरबॅगची सुविधा दिली जाण्याची योजना आहे. दरवर्षी रस्ते अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. अशात लोकांची सुरक्षा पाहता कार्ससाठी एयरबॅग्सची सुविधा आणण्यात आली. आता याच सुविधेचा टू-व्हिलर्ससाठीही प्रयोग होण्याची योजना आहे. क्रॅश टेस्ट पूर्ण - पियाजिओ आणि ऑटोलिव या दोन कंपन्यांनी टू-व्हिलर्स वाहनांसाठी एयरबॅग्सबाबत योजना आखली आहे. दोन्ही कंपन्यांनी नुकत्याच केलेल्या घोषणेनुसार, आता ते टू-व्हिलर्ससाठीही एयरबॅग्स बनवण्यासाठी एकत्रित काम करत आहे. ऑटोलिवने आधीच अॅडव्हान्स सिमुलेशन टूलच्या माध्यमातून सुरक्षा सुविधेबाबत एक प्राथमिक कॉन्सेप्ट तयार केला आहे. याची क्रॅश टेस्टही करण्यात आली आहे. आता पियाजिओ ग्रुपसह ऑटोलिव हे उत्पादन आणखी विकसित करण्यासाठी प्रयत्न करेल आणि भविष्यात लवकरच हे बाजारात आणलं जाईल अशी अपेक्षा आहे.
सेकंदात ओपन होईल एयरबॅग - मिळालेल्या रिपोर्टनुसार, दोन्ही कंपन्या मिळून या टेक्नोलॉजीवर काम करत आहेत. टू-व्हिलरमध्ये एयरबॅग्स फ्रेमच्यावर लावल्या जातील. अपघात झाल्यास या एयरबॅग्स सेकंदात ओपन होतील आणि वाहन चालकाला या एयरबॅग्समुळे मोठी सुरक्षा मिळेल. ऑटोलिवचे सीईओ आणि अध्यक्ष मिकेल ब्रॅट यांनी सांगितलं, की ऑटोलिव कंपनी अधिकाधिक लोकांचं आयुष्य वाचवण्यासाठी, समाजासाठी जागतिक स्तरावरील जीवन रक्षक उपाय प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहे. म्हणूनच आम्ही अशी उत्पादनं विकसित करत आहोत, जी विशेषत: असुरक्षित रस्त्यावर चालकाचं संरक्षण करेल. टू-व्हिलरसाठी 2030 पर्यंत 100000 एयरबॅग्स तयार करणं लक्ष्य असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
सध्याच्या स्कूटर आणि बाइक ABS सारख्या अनेक सुरक्षा फीचर्सनी युक्त आहेत. त्यानंतर आता एयरबॅग्सची सुविधा जोडली गेल्यास वाहन चालकांची सुरक्षा आणखी मजबूत होण्यास मदत होईल.