सी-सेक्शन डिलिव्हरी दरम्यान टाके येतात. अशा परिस्थितीत नेहमी घातले जाणारे अंडरवेयर उपयोगी पडतीलच असं नाही. त्यामुळे आरामदायक अंडरवेयर तयार ठेवा.
औरंगाबाद, 25 मे: आईच्या प्रेमाची तुलना जगातील कोणत्याच गोष्टीशी केली जाऊ शकत नाही. आपलं बाळ संकटात सापडल्यानंतर आई काहीही करून बाळाची संकटातून सुटका करू शकते. याचा प्रत्यय नुकताचं औरंगाबाद (Aurangabad) याठिकाणी आला आहे. येथील एका 2 वर्षाच्या लहान बाळाला कोविडची (2 Years old baby infected with corona) लागण झाली होती. बाळाचं सर्व शरीर निकामी झालं होतं. बाळ जगेल की नाही? याबाबत अनेकांना शंका होती. पण बाळाच्या आईनं धीर न सोडता पीपीई किट घालून बाळासोबत कोविड वार्डातचं थांबण्याचा निर्णय (Mother wear PPE kit and stay in Covid ward) घेतला. 10 दिवसांच्या उपचारानंतर जेव्हा बाळ ठणठणीत बरं झालं तेव्हाचं या मातेनं सुटकेचा निश्वास सोडला आहे. काही दिवसांपूर्वी नांदेड येथील एका बाळाला कोविडची लागण झाली होती. यानंतर त्याला तेथीलचं स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. काही दिवस उपचार केल्यानंतर बाळ कोरोनामुक्त झाल्याचं सांगून बाळाला डिस्चार्ज देण्यात आला. पण त्यानंतर काही दिवसांतचं बाळाला पुन्हा कोरोनाची लक्षणं दिसू लागली. बाळाला तीव्र ताप येणं, कमी रक्तदाब, मेंदूज्वर, आतड्यांवर सूज, लघवी कमी होणं असे विविध त्रास व्हायला लागले. यामुळे बाळाच्या आई -वडिलांची चिंता वाढली. यानंतर बाळाला पुन्हा रुग्णालयात दाखल केलं. हे ही वाचा- जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूची बातमी लहान मुलांना कशी द्याल? पण याठिकाणी अपेक्षित फरक पडत नसल्यानं बाळाला औरंगाबाद याठिकाणी नेण्याचा सल्ला नांदेडमधील डॉक्टरांकडून देण्यात आला. यानंतर बाळाच्या आई वडिलांनी त्वरित बाळाला औरंगाबाद याठिकाणी हलवलं. यावेळी बाळाचे बहुतांशी अवयव निकामी होत होते. दैनिक लोकमत नं दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित 2 वर्षाच्या बाळाला 5 मे रोजी कमलनयन बजाज रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. निखिल पाठक यांनी रुग्णालयात दाखल करून घेतलं. हे ही वाचा- कोरोनाची तिसरी लाट खरंच लहान मुलांसाठी घातक?आरोग्य मंत्रालयाच्या उत्तरानं दिलासा यावेळी बाळाची कोरोना चाचणी केली असता, त्याला कोरोनाची बाधा झाल्याचं निष्पन्न झालं. तर दुसरीकडे आई आणि वडील दोघंही निगेटिव्ह आढळले. त्यामुळे प्रकृती गंभीर असलेल्या या कोरोनाबाधित बाळासोबत कोण थांबणार असा प्रश्न पडला होता. तेव्हा कसलाही विचार न करता बाळाच्या आईनं पीपीई किट घालून बाळासोबत कोविड वॉर्डात थांबण्याचा निर्णय घेतला. हे ही वाचा- असा हवा जिल्हाधिकारी! गरीबाच्या 2 दिवसाच्या मुलाला वाचविण्यासाठी धावले.. यानंतर अवघ्या 8 दिवसांत बाळाची प्रकृती सामान्य झाली. तर पुढच्या दोन दिवसांत बाळा डिस्चार्जही देण्यात आला. डॉक्टरांचा औषधोपचार आणि पीपीई किट घालून बाळाच्या आईनं केलेल्या संघर्षामुळं बाळाला मृत्यूच्या दाढेतून परत आणता आलं आहे. बाळानं कोरोनावर यशस्वी मात केल्यानंतर केवळ आई-बाबाच सुखावले नाहीत, तर डॉक्टरांच्या संपूर्ण पथकाचा आनंद गगनात मावत नव्हता.