आर्थिक राशीभविष्य
मेष (Aries) : आर्थिक प्रगतीच्या संधी वाढतील. विविध क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी कराल. नवीन कामाची सुरूवात करण्यासाठी योग्य काळ आहे. व्यावसायिकता राखाल. जोडीदारांवरील आत्मविश्वास वाढेल. एखाद्या महत्त्वाच्या चर्चेत सहभागी व्हाल. आर्थिक विषयांमध्ये रूची वाढेल. स्पर्धेत प्रभावी रहाल. करिअर व्यवसायात गती राहील. उपाय : घरातून बाहेर पडण्यापूर्वी वडिलधाऱ्या व्यक्तींचा आशीर्वाद घ्या. वृषभ (Taurus) : काहीशी गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. वैयक्तिक बाबी सुरळीत राहतील. आर्थिक गोष्टींमध्ये संमिश्र परिस्थिती राहील. कृपया कर्ज घेणं टाळा. एखाद्या गोष्टीबद्दल नीट संशोधन करणं गरजेचं आहे. नोकरी-व्यवसाय संमिश्र राहील. आवश्यक निर्णय तातडीने घेणं गरजेचं आहे. उपाय : श्रीकृष्ण मंदिरात बासरी अर्पण करा. मिथुन (Gemini) : व्यवसायात भागीदारी संबंधित प्रकरणांमध्ये तुमच्या बाजूने निकाल लागेल. व्यावसायिक यशात वाढ होईल. अधिकारी वर्गाला आनंदाची बातमी मिळेल. मोठे उद्योग व्यवसायात सहभागी होण्याची शक्यता आहे. नेतृत्वाची भावना निर्माण होईल. जबाबदाऱ्या पूर्ण कराल. आर्थिक लाभ होईल. कामात स्पष्टता राहील. उपाय : भगवान शिवाला पंचामृताने अभिषेक करा. कर्क (Cancer) : गुंतवणूक करताना खबरदारी बाळगा, फसवणूक होण्याची शक्यता आहे. अनोळखी व्यक्तींवर लगेच विश्वास ठेवणं टाळा. मीटिंगमध्येही सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. महत्त्वाच्या डीलमुळे करारात संयम वाढेल. गोंधळून जाऊ नका, कोणताही निर्णय सावधानतेने घ्या. सहकाऱ्यांचा विश्वास जिंकाल. परिस्थिती सामान्य राहील. व्यवस्थेवर विश्वास ठेण्याची गरज आहे. उपाय : हनुमान चालिसाचं पठण करा. सिंह (Leo) : अत्यावश्यक कामं तातडीने पूर्ण कराल. भरपूर आत्मविश्वास मिळेल. आर्थिक सुबत्ता राहील. चांगल्या ऑफर्स चालून येण्याची शक्यता आहे. विविध प्रश्न लवकरच मार्गी लागतील. करिअर किंवा व्यवसायावर लक्ष केंद्रित कराल. लाभ चांगला राहील. उपाय : श्रीकृष्णाच्या मंदिरात बासरी अर्पण करा. कन्या (Virgo) : कामाच्याबाबतीत गांभीर्य बाळगा. जवळच्या व्यक्ती आणि सहकाऱ्यांची मदत लाभेल. गुंतवणुकीच्या मोहाला बळी पडणं टाळा. करिअर आणि व्यवसायात सकारात्मकता राहील. कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा आणि सहकार्य मिळेल. सक्रियपणे कार्यरत रहाल. वडिलोपार्जित व्यवसायात तुमची कामसू वृत्ती परिणामकारक ठरेल. उपाय : कृपया पिवळे खाद्यपदार्थ दान करा. तूळ (Libra) : करिअर-बिझनेसमध्ये संकोच कमी होईल. व्यावसायिक कामांना गती मिळेल. वस्तू आणि विचारांची देवाण-घेवाण वाढेल. कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. कामात निष्काळजीपणा मात्र टाळण्याची गरज आहे. अपेक्षित यश मिळेल. उपाय : गाईंना हिरवा चारा खाऊ घाला. वृश्चिक (Scorpio) : आर्थिक गोष्टी सुरळीत होतील, मोठ्या प्रमाणात बचत होईल. करिअर-बिझनेसबाबत केलेले प्रयत्न फळाला येतील. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. व्यवसाय चांगला होईल. कामाच्या बाबतीत सकारात्मकता वाढेल, त्यामुळे यश मिळेल. चांगल्या प्रमाणात नफा होईल. अनुकूलता वाढेल. उपाय : भगवान भैरवाच्या मंदिरात नारळ अर्पण करा.
धनू (Sagittarius) : व्यावसायिक कामगिरी वाढेल. नोकरी-व्यवसायात शुभ काळ येणार आहे. व्यवस्थापन मजबूत राहील. आर्थिक प्रश्न लवकरच मार्गी लागतील. योग्य दिशेने पुढे जात आहात, त्यामुळे धैर्य वाढेल. आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित कराल. उद्योग-व्यवसायात सुधारणा होईल. नवीन कामात रस घ्याल. उपाय : भगवान शंकराला अर्घ्य द्या. मकर (Capricorn) : कृपया कर्ज देणं किंवा घेणं दोन्ही टाळा, अन्यथा नुकसान होऊ शकतं. कामाच्या ठिकाणी अतिरिक्त बडबड टाळा. व्यावसायिकता जपण्याची गरज आहे. जुनी प्रकरणं पुन्हा डोकं वर काढू शकतात. गुंतवणुकीमध्ये रस घ्याल. व्यावसायिक कार्यात जागरूक रहाल. व्यवसायवृद्धीवर भर द्याल. उपाय : हनुमान मंदिरात तुपाचा दिवा लावा. कुंभ (Aquarius) : कामाच्या ठिकाणी अपेक्षित परिणाम साध्य कराल. वैयक्तिक कामगिरीवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे, ज्यामुळे आर्थिक लाभ मिळेल. सर्वांचे सहकार्य राहील. करिअर व्यवसायात स्पर्धा टिकवून ठेवाल. महत्त्वाच्या व्यक्तींच्या भेटीगाठी होतील. व्यावसायिक उद्दिष्टं पूर्ण होतील. सर्व जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडाल. व्यवसाय आणखी मजबूत होईल. हे वाचा - अस्ताला जाणारा शनी या राशीच्या लोकांना अडचणीत आणेल; महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला उपाय : श्रीराम मंदिरात ध्वज अर्पण करा. मीन (Pisces) : कामाच्या ठिकाणी प्रगतीसाठी आणखी प्रयत्न करण्याची गरज आहे. पदप्रतिष्ठेत वाढ होईल. व्यवसायात सहकार्य मिळेल, सक्रिय रहाल. वातावरण सकारात्मक राहील. सध्या मोठा विचार करण्याची गरज आहे. समोर येणारे अडथळे आपोआप दूर होतील. सर्वांचं सहकार्य लाभेल. उपाय : सरस्वती मातेला पांढऱ्या फुलांची माळ अर्पण करा.