12 तारखेला जन्मलेले लोक स्पष्टवक्ते असतात.
आज शनिवार दिनांक 12 जून 2021. तिथी ज्येष्ठ शुद्ध द्वितीया. आजचे बारा राशींचे राशी भविष्य.. मेष राशीच्या व्यक्ती साठी आजचा दिवस जनसंपर्क आणि प्रवास असा आहे. भेटीगाठी होऊ शकतात. दिवस चांगला आहे. वृषभ राशीच्या धनस्थानातील चंद्र भ्रमण अनुकूल आहे. आर्थिक व्यवहार जपून करा. शब्द हे शस्त्र आहे. वाणी सौम्य असावी. आनंदाने दिवस व्यतीत होईल. मिथुन राशी स्थानी असलेला चंद्र उत्तम आहे. दिवस शांततेत घालवा . पुढील आठवड्याची तयारी करा. नवीन खरेदी करण्याची इच्छा होईल. समाधानकारक दिवस. कर्क राशीला आज बारावा चंद्र , राशीतील मंगळ शुक्राचे भ्रमण व्यग्र ठेवेल. पैसा खर्च होईल. दिवस काळजीपूर्वक घालवा. शनी जप करणे फायद्याचे ठरेल. सिंह आज दिवस लाभदायक आहे. मित्र मैत्रिणी सोबत दिवस आनंदात घालवा. पण खर्च सांभाळून करा. गुरु सान्निध्य शुभ फल देईल. कन्या खुप काम केल्यानंतर आज हक्काची विश्रांती मिळायला हवीच. अचानक नवीन काम, फोन येऊ शकतो. पण दिवस चांगला जाईल. काळजी नको. तुला आज दिवस छान कुटुंबातील व्यक्ती सोबत घालवा. मानसिक ताण कमी होईल. ईश्वरी साधना फलद्रुप होईल. थोडा वेळ स्वतः साठी ठेवावा. वृश्चिक राशीतील केतू, आध्यात्मिक कल वाढवतो. सूर्य राहू, मंगळ, शुक्र व अष्टमात चंद्र अशी ग्रह स्थिती फार अनुकूल नाही पण गुरुकृपा आहे. मध्यम दिवस आहे. धनु आज धनु राशीच्या व्यक्ती जोडीदाराला घेऊन फिरायला जाण्याची शक्यता आहे. आनंदात कुटुंबासोबत वेळ घालवा. पुढील आठवड्याची रूपरेषा आखून ठेवा . मकर राशीतील शनी, सहावा चंद्र आणि मंगळ शुक्र ही ग्रहस्थिती अचानक येणारे प्रश्न सुचवतात. सांभाळून राहावे. प्रकृतीच्या तक्रारी कडे लक्ष द्यावे. उपासना करत रहावी. कुंभ मुलांकडे लक्ष द्या, राशीतील गुरू, चतुर्थात राहू आणि सूर्य ही ग्रह स्थिती आहे. घरा मध्ये काही बदल करावे असे वाटेल. दिवस मध्यम आहे. मीन चतुर्थ चंद्र आईकडे लक्ष द्या असे सुचवतो. घर आणि कुटुंब या सोबत वेळ घालवा. गुरूची उपासना करावी. दिवस चांगला आहे. शुभम भवतु. (लेखिका ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासक आहेत.)