JOIN US
मराठी बातम्या / राशीभविष्य / दोघांमध्ये पहिल्यापासूनच येते चांगली समज! हे दोन जन्मअंक असलेल्यांचे छान जुळते

दोघांमध्ये पहिल्यापासूनच येते चांगली समज! हे दोन जन्मअंक असलेल्यांचे छान जुळते

या दोघांमध्ये अत्यंत उत्तम असा समतोल साधला जातो. दोघांच्या भूमिका निश्चित असल्यामुळे ते वैयक्तिक आयुष्यात एकमेकांवर विश्वासाने अवलंबून राहू शकतात.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

स्वामी ग्रह – चंद्र 2 हा अंक 1 आणि 3 या अंकांशी किती अनुरूप आहे? #नंबर 1 : 1 आणि 2 या अंकांचं नाते आश्चर्यकारकरित्या सौदार्हपूर्ण आहे. 1 या अंकावर सूर्याचा, तर 2 अंकावर चंद्राचा प्रभाव आहे; त्यामुळे या दोघांमध्ये पहिल्यापासूनच चांगली समज आहे. यामुळेच या दोन जन्मांकाच्या व्यक्ती दीर्घकाळ एकत्र राहतात. यांच्यातील वैयक्तिक नातं, वा बिझनेस पार्टनरशिप भरपूर टिकून राहते. 1 जन्मांकाच्या व्यक्ती प्रचंड हेकेखोर असतात, तर दुसरीकडे 2 जन्मांकाच्या व्यक्ती भरपूर लवचिक असतात. यामुळेच या दोघांमध्ये अत्यंत उत्तम असा समतोल साधला जातो. दोघांच्या भूमिका निश्चित असल्यामुळे ते वैयक्तिक आयुष्यात एकमेकांवर विश्वासाने अवलंबून राहू शकतात. फ्रँचायझी स्ट्रक्चर किंवा डिस्ट्रिब्यूशन पद्धतीचा व्यवसाय असणाऱ्या व्यक्तींनी आपल्या नावामध्ये बदल करून 2 अंकांवर आणावे ज्यामुळे फायदा होईल. 2 जन्मांक असलेल्या महिला आपल्या पतीच्या आयुष्यात भरभराट आणतात. 2 जन्मांक असलेल्या व्यक्तींनी सूर्याला नियमित जल अर्पण करावं, तसंच नेहमी चंद्रदेवाच्या मंत्राचा जप करावा.

#नंबर 3 : 2 अंकाप्रमाणेच 3 जन्मांकाच्या व्यक्तीही भरपूर प्रमाणात लवचिक असतात. मात्र, तरीही हे दोघे आपापल्या जीवनात अगदी तटस्थ प्रभाव टाकतात. 2 हा अंक संवाद दर्शवतो, तर 3 हा अंक सर्जनशीलता; मात्र तरीही या दोन अंकांच्या व्यक्ती एकत्र येऊन अगदी सरासरी अभिव्यक्ती तयार करतात. 3 हा अंक 2 अंकांच्या व्यक्तींसाठी ज्ञानाचा स्रोत ठरू शकतो. विशेषतः विद्यार्थी, खेळाडू, कलाकार, लेखक, भविष्यवेत्ते आणि डॉक्टरांसाठी हे लागू होऊ शकते. मात्र, तरीही 2 अंकांच्या व्यक्तींना 3 संख्या असणारी नावं टाळण्याचा सल्ला दिला जातो, कारण याचा फारसा परिणाम होत नाही. मनोरंजन क्षेत्रातील व्यक्तींसाठी मात्र 2 आणि 3 हे कॉम्बिनेशन फायद्याचं ठरू शकतं. कॉलेज लाईफ, घरगुती आणि सामाजिक वर्तुळात अनौपचारिक संबंध राखण्याच्या दृष्टीने 2 आणि 3 हे अंक विश्वासार्ह मानले जातात.या दोन्ही अंकांची वृत्ती काळजी घेणारी असली, तरी ते स्पर्धात्मक स्वभावाचेही आहेत हे लक्षात घ्या. हे वाचा -  सोमवारी उपवास करण्याऱ्यांनी या चुका टाळा; महादेवाची कृपा नव्हे होईल अवकृपा (सूचना : येथे दिलेली माहिती अंकशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या