स्वप्नात स्वत:ला हसताना किंवा रडताना पाहण्याचा अर्थ काय?

रात्री गाढ झोपेत जी स्वप्ने येतात ती आपल्या दिवसभराच्या कामाचे आणि आपल्या मनात निर्माण झालेल्या विचारांचे परिणाम असतात.

 लोकांना काही स्वप्ने आठवतात तर काही स्वप्ने विसरली जातात.

स्वप्नशास्त्रानुसार, प्रत्येक स्वप्नात काही ना काही संकेत असतात.

स्‍वप्‍नात स्‍वत:ला हसताना किंवा रडताना पाहण्याच काय अर्थ असतो ते पाहुया

हसणे आरोग्यासाठी चांगले असते, हसणे हा एक चांगला व्यायाम देखील मानला जातो, परंतु..

स्वप्नात स्वतःला हसताना पाहिले तर हे स्वप्न तुमच्यासाठी शुभ मानले जात नाही.

उलट, स्वप्नात स्वतःला रडताना पाहण्याचं स्वप्न त्या व्यक्तीसाठी शुभ मानलं जाऊ शकतं.

 स्वप्नात स्वतःला रडताना पाहण्याचा अर्थ तुमच्या आयुष्यात लवकरच चांगला बदल होणार आहे.

 या व्यतिरिक्त जर स्वप्नात एखादे मूल हसताना दिसत असेल तर ते चांगल्या घटनांचे संकेत आहे.

सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.