JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अहमदनगर / मंदिरं न उघडल्यास रस्त्यावर उतरू, अण्णांचा ठाकरे सरकारला इशारा

मंदिरं न उघडल्यास रस्त्यावर उतरू, अण्णांचा ठाकरे सरकारला इशारा

दारूची दुकानं, हॉटेल सर्व उघडी केली आहेत. तेथे होत असलेल्या गर्दीतून कोरोना वाढत नाहीये का?

जाहिरात

दारूची दुकानं, हॉटेल सर्व उघडी केली आहेत. तेथे होत असलेल्या गर्दीतून कोरोना वाढत नाहीये का?

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अहमदनगर, 28 ऑगस्ट :  राज्यातील मंदिरं (temples ) उघडण्यासाठी सरकारला काय अडचण आहे? दारूची दुकानं, हॉटेल सर्व उघडी केली आहेत. तेथे होत असलेल्या गर्दीतून कोरोना वाढत नाहीये का? जिथून मिळणाऱ्या सात्विक विचारातून माणसे घडत आहेत अशा मंदिरांना बंद करून सरकारने काय मिळवले ? असा सवाल करताना जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna hazare) संतापले असून  मंदिरं जर उघडली नाहीतर जनतेसाठी रस्त्यावर उतरू, असा इशाराही अण्णांनी दिला.

Explainer: तालिबानचा कथित म्होरक्या हिबातुल्लाह अखुंदजादा आहे तरी कुठे?

अहमदनगरच्या मंदिर बचाव कृती समितीने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेवून राज्यातील बंद असलेली सर्व मंदिरं उघडण्यासाठी सरकाराकडे पाठपुरावा करावा असं साकडं घातलं. मदिरं उघडण्यासाठी जनतेने आता रस्त्यावर उतरले पाहिजे. मंदिर बचाव कृती समितेने यासाठी मोठे आंदोलन उभारावे. यात मी स्वतः सहभागी होईल. सरकारचे धोरण बरोबर नाही. 10 दिवसात जर मंदिरं उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला नाहीतर मोठे जेल भोरो आंदोलन करा मी तुमच्या बरोबर राहील, असा इशारा अण्णा हजारे यांनी दिला. काजोल ते करीना कपूर या अभिनेत्रींना चित्रिकरणा दरम्यानचं मिळाली होती ‘Good News’ तसंच, भरकटत चालेल्या समाजाला फक्त मंदिरेच तारू शकतात यावर माझा विश्वास आहे. मी आज जे काही आहे ते केवळ मंदिरामधून मिळालेल्या संस्कारामुळेच आहे. आज 84 वय झाले आहे. मात्र माझ्यावर एवढासाही कोणताच डाग नाहीये. हा मंदिरातून मिळालेल्या संस्काराचा परिणाम आहे. संत ज्ञानेश्वर यांच्या समाधी जवळ जाऊन तुळशीची माळ घालून वारकरी झालोय. संतांचे विचार देणारे मंदिरे का बंद केली. सरकारला संतांचे विचार काय समजले ? त्यामुळे सरकाने आपले धोरण बदलावे व त्वरित मंदिरे उघडावी, अशी मागणीच अण्णांनी केली. वसंत लोढा यांनी यावेळी मंदिर बचाव कृतीसमितीने यापूर्वी केलेल्या विविध आंदोलनाची माहिती देवून पुढील काळात अण्णा हजारे यांच्या नेतृताखाली उग्र आंदोलन करणार असल्याचं सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या