जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अहमदनगर / वृद्ध दाम्पत्याची हत्या करणारे चार दिवसांत गजाआड, 'या' क्लूच्या आधारे पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वृद्ध दाम्पत्याची हत्या करणारे चार दिवसांत गजाआड, 'या' क्लूच्या आधारे पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वृद्ध दाम्पत्याची हत्या करणारे चार दिवसांत गजाआड, 'या' क्लूच्या आधारे पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Shirdi senior citizen murder case solved in four days: चार दिवसांपूर्वी शिर्डीतील वृद्ध दाम्पत्याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

शिर्डी, 29 जून: शिर्डी (Shirdi) जवळील को-हाळे गावात (Korhale Village) 25 जून रोजी झालेल्या दाम्पत्याच्या हत्येचा पोलिसांनी उलगडा (Senior citizen murder case solve) केला आहे. या प्रकरणातील पाच पैकी तीन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे एका क्लूच्या आधारे पोलिसांनी या आरोपींना अटक केली आहे. घटनेनंतर पोलिसांनी आपली सूत्रे कामाला लावली आणि अवघ्या चारच दिवसांत हत्याकांडाचा उलगडा केला आहे. राहाता तालुक्यातील को-हाळे गावात 25 जून रोजी वृद्ध पती-पत्नीची हत्या करण्यात आली होती. शशिकांत चांगले वय 55 वर्ष आणि सिंधूबाई चांगले वय 50 वर्ष यांची झोपेत असतानाच मध्यरात्री डोक्यात फावडे घालून हत्या केली होती. प्रथमदर्शनी ही हत्या कौटुंबिक कलहातून झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आलो होता. इतकेच नाहीतर त्या दृष्टीने पोलिसांचा तपासही सुरू होता. चोरट्यांनी गोठ्यातून बकरी पळवली; बकरीचोरी सीसीटीव्हीत कैद, VIDEO VIRAL भावाशी शेतीचे वादही सुरू होते त्यामुळे त्यांचा यात सहभाग आहे का? असाही पोलिसांनी तपास केला. मात्र ही हत्या अट्टल दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याच्या उद्देशाने केल्याचं स्पष्ट झालं आहे. गुन्ह्याच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे स्वतंत्र पथके तयार करण्यात आले होते. शेतीच्या वादाच्या कारणाव्यक्तिरिक्त सदरचा गुन्हा हा इतर कोणत्या कारणामुळे घडला आहे का? याचा तपास सुरु होता. या तपासा दरम्यान निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त खबऱ्याकडून हा गुन्हा कोणी केला याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्या आधारे पोलिसांनी देवेन्द्र दुधकाल्या उर्फ भारत भोसले, दिलीप भोसले आणी आवेल भोसले या तिघांना गजाआड केलं आहे. दरोड्याच्या उद्देशाने त्यांची हत्या झाल्याचं निष्पन्न झालं असून पाच पैकी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. हत्या करण्याच्या पद्धतीवरून पोलिसांनी आरोपींना शिताफिने अटक केली आहे. या गुन्ह्यात पकडलेल्या आरोपींच्या मित्रांनी अशाच प्रकारे जिल्ह्यात अगोदर हत्या केल्या आहेत.. त्यामुळे पोलिसांनी केवळ हत्या करण्याच्या पद्धतीवरून या हत्याकांडाचा छडा लावला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: crime , Shirdi
  • First Published :
जाहिरात
जाहिरात