मराठी बातम्या /बातम्या /ahmednagar /नातेवाईकाच्या लग्नात आला अन् पोलिसांच्या तावडीत सापडला, फरार आरोपीला फिल्मी स्टाईलनं अटक

नातेवाईकाच्या लग्नात आला अन् पोलिसांच्या तावडीत सापडला, फरार आरोपीला फिल्मी स्टाईलनं अटक

क्लासवन अधिकाऱ्याचे अश्लील व्हिडीओ (Class one officer obscene video ) तयार करून खंडणी (Ransom Case) मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला नगर पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करत अटक (fugitive accused arrest) केली आहे.

अहमदनगर, 07 जून: क्लासवन अधिकाऱ्याचे अश्लील व्हिडीओ (Class one officer obscene video ) तयार करून खंडणी (Ransom Case) मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या फरार आरोपीला नगर पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करत अटक (fugitive accused arrest) केली आहे. संबंधित आरोपी आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या लग्नात (accused come to relative marriage) येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. याप्रकरणी नगर पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत.

संबंधित फरार आरोपीचं नाव महेश बागले असून त्याने काही दिवसांपूर्वी आपल्या महिला साथीदाराच्या मदतीने क्लासवन अधिकाऱ्याचे अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड केले होते. या गुन्ह्यात बागले याचा मित्र सागर खरमाळे याचाही सहभाग होता. पण गुन्हा दाखल झाल्यापासून बागले फरार होता. मागील बऱ्याच दिवसांपासून पोलीस बागले याचा शोध घेत होते. पण त्याने अनेकदा पोलिसांना गुंगारा दिला होता.

यावेळी मात्र फरार आरोपी महेश बागले आपल्या एका नातेवाईच्या लग्नात येणार असल्याची गुप्त माहिती नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षण राजेंद्र सानप यांना मिळाली होती. यानंतर नगर तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस पथकाने नगर तालुक्यातील मेहकरीजवळील शहाडोंगर या विवाहस्थळी सापळा रचला होता. दरम्यान याठिकाणी आलेल्या बागले याने पोलिसांना पाहून डोंगरांच्या दिशेनं धूम ठोकली.

हे ही वाचा-पुण्यात संचारबंदीतही तळीरामांची चंगळ; घसा ओला करताना पोलिसांनी टाकली धाड

पण पोलीस पथकाने आरोपी बागले याचा फिल्मी स्टाईलने पाठलाग करत अटक केली आहे. ही कारवाई रविवारी मेहकरीजवळील शहाडोंगर परिसरात केली आहे. या घटनेनं विवाहस्थळी बराच गोंधळ निर्माण झाला होता. पण आरोपी बागलेला बेड्या ठोकल्यानंतर वातावरण निवळलं. फरार आरोपी महेश बागले याने साथीदार सागर खरमाळे आणि एका महिलेच्या मदतीने क्लासवन अधिकाऱ्याचा अश्लील व्हिडीओ तयार केला होता. संबंधित अधिकाऱ्याकडे आरोपींनी तीन कोटींची खंडणी मागितली होती. या घटनेचा पुढील तपास नगर पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Ahmednagar, Crime news, Police arrest