राधाकृष्ण विखे पाटील यांचा बाळासाहेब थोरातांवर निशाणा?; म्हणाले, ''नगरच्या एका मंत्र्याच्या पापाचा घडा भरलाय''

राधाकृष्ण विखे पाटील यांचा बाळासाहेब थोरातांवर निशाणा?; म्हणाले, ''नगरच्या एका मंत्र्याच्या पापाचा घडा भरलाय''

अहमदनगर मधील भाजपचे ज्येष्ठ नेते (Senior BJP leader ) राधाकृष्ण विखे पाटील यांनी (Radhakrishna Vikhe Patil) काँग्रेस (Congress) राष्ट्रवादीवर (NCP) जोरदार हल्ला चढवला आहे.

  • Share this:

अहमदनगर, 18 ऑक्टोबर: अहमदनगर मधील भाजपचे ज्येष्ठ नेते (Senior BJP leader ) राधाकृष्ण विखे पाटील यांनी (Radhakrishna Vikhe Patil) काँग्रेस (Congress) राष्ट्रवादीवर (NCP) जोरदार हल्ला चढवला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar district) एका मोठया मंत्र्याचे नाव भ्रष्ट्राचारात येत असून कोणी किती महसूल गोळा केला. हे आपोआप समोर येईल,’ असं सूचक वक्तव्य विखे पाटील यांनी केलं आहे.

विखे पाटील यांनी कोणाचंही नाव घेतले नाही. मात्र, त्यांचा रोख महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे असल्याचं दिसून येत आहे. श्रीरामपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना विखे पाटील यांनी हा आरोप केला.

हा मंत्री कोण, असं पत्रकारांनी विचारलं असता ‘जरा सबुरीने घ्या, लवकरच नाव उघड होईल,’ असंही विखे पाटील म्हणाले. नगर जिल्ह्यातील एका मंत्र्याच्या पापाचा घडा भरला असून कोणी किती महसूल गोळा केला. हे आपोआप समोर येईल,’ असं वक्तव्य विखे पाटील यांनी केलं आहे.

हेही वाचा-  Gold Price Today: आठवड्याच्या सुरुवातीला सोने-चांदी दरात वाढ, तपासा आजचा भाव

ठाकरे सरकारमध्ये महसूलमंत्रीपदाची जबाबदारी बाळासाहेब थोरात यांच्याकडे आहे. थोरातांच्या खात्यावर बोट ठेवत अप्रत्यक्षरित्या या खात्यात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचं विखे यांनी म्हटलंय.

Published by: Pooja Vichare
First published: October 18, 2021, 11:58 AM IST

ताज्या बातम्या