जाहिरात
मराठी बातम्या / मनी / कृषी / EXCLUSIVE: ऐकावं ते नवल! एकाच रोपाला येतात बटाटा, वांगी आणि टोमॅटो, कसा झाला चमत्कार?

EXCLUSIVE: ऐकावं ते नवल! एकाच रोपाला येतात बटाटा, वांगी आणि टोमॅटो, कसा झाला चमत्कार?

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील चंद्रशेखर आझाद कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या भाजीपाला विज्ञान विभागात एक वनस्पती आणण्यात आलीय. ही वनस्पती भारतीय भाजी संशोधन केंद्र वाराणसीच्या शास्त्रज्ञांनी विकसित केली असून, तिला ब्रिमेटो प्रजातीची वनस्पती, असं म्हटलं जातं.

  • -MIN READ Local18 Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 17 फेब्रुवारी- उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील चंद्रशेखर आझाद कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या भाजीपाला विज्ञान विभागात एक वनस्पती आणण्यात आलीय. ही वनस्पती भारतीय भाजी संशोधन केंद्र वाराणसीच्या शास्त्रज्ञांनी विकसित केली असून, तिला ब्रिमेटो प्रजातीची वनस्पती, असं म्हटलं जातं. या वनस्पतीचं वैशिष्ट्य म्हणजे तिला एकाचवेळी बटाटा, वांगी आणि टोमॅटो अशा तिन्ही भाज्या येतात. वनस्पतीच्या मुळांमध्ये म्हणजेच जमिनीच्या खाली बटाटा वाढतो, तर वांगी आणि टोमॅटो हे फांद्यांना येतात. तीन बियांपासून हे रोप तयार करण्यात आले असून, आता कानपूरच्या हवामानात या वनस्पतीची वाढ कितपत होऊ शकते, यादृष्टीने संशोधन सुरू आहे. याबाबत ‘न्यूज18 लोकल’शी बोलताना सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर व्हेजिटेबलचे प्रभारी डॉ. डी. पी. सिंह यांनी सांगितलं की, ‘कानपूरच्या हवामानानुसार ही वनस्पती कसा प्रतिसाद देतेय, हे पाहिलं जात आहे. ती चांगल्या पद्धतीनं वाढली, तर इथेही अशा प्रकारची विविधता असणारी रोपx विकसित करण्यात येतील. जेणेकरून जे लोक स्वतःच्या घरात भाजीपाला पिकवतात, त्यांना फक्त एक रोप लावून बटाटा, वांगी आणि टोमॅटो या तिन्ही भाज्या मिळतील.’ (हे वाचा: Jalebi : सर्वांच्या आवडीची जिलेबीचा जन्म कुठं झाला, कधी विचार केलाय? ) घरच्याघरी भाजीपाला पिकवणं होईल सोपं ‘तीन बियांपासून तयार करण्यात आलेल्या ब्रिमेटो प्रजातीच्या एका रोपामुळे अंदाजे प्रत्येकी अडीच किलो वांगी, टोमॅटो आणि बटाट्याचं उत्पादन मिळेल. हे एका कुटुंबासाठी पुरेसे असेल,’ असेही डॉ. सिंह यांनी सांगितलं. ‘ही वनस्पतीची जात कानपूरमध्येही तयार केली जाईल, आणि घरी भाजीपाला पिकवणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचवली जाईल. जेणेकरून त्यांना रोगमुक्त, कीटकनाशकमुक्त भाज्या मिळतील. या रोपासाठी शेताची किंवा बागेची गरज नाही, फक्त कुंडी आवश्यक आहेत. बनारस येथून सध्या अशी पाच रोपं कानपूरमध्ये आणलीत. ही सर्व रोपं कानपूरच्या हवामानात विकसित केली जात आहेत. या रोपांना वांगी, टोमॅटो, बटाटे येऊ लागलेत,’ असंही ते म्हणाले.

    News18लोकमत
    News18लोकमत

    दरम्यान, कृषीप्रधान देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतामध्ये आता कृषी क्षेत्रामध्ये वेगानं विकास होऊ लागलाय. या क्षेत्रातील संशोधन वाढल्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे शेती करण्याचं प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. आता उच्चशिक्षित तरुणसुद्धा शेतीसोबत कृषीपूरक व्यवसाय करण्यास प्राधान्य देऊ लागलेत. वेगवेगळ्या कृषी विद्यापीठांमध्ये प्रवेश घेऊन शेती विषयक संशोधनात सहभागी होणाऱ्या तरुणांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात कृषी क्षेत्रात सुरू असलेले संशोधन आणखी वेगवान होण्याची शक्यता आहे. एकाच रोपाला वांगी, टोमॅटो, बटाटे येण्याचं संशोधन ही त्याचीच नांदी आहे, असं म्हंटले तर वावगे ठरणार नाही.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात