पुणतांबा, 03 जून : पुणतांबा (puntamba farmers agitation) येथे एक जूनपासून सुरू झालेल्या शेतकरी धरणे (farmers) आंदोलनाला नेते मंडळी भेट देत आहेत. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनावर महाविकास आघाडी सरकार (mahavikas aghadi) सकारात्मक दिसत आहे. काल महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी येथे पुणतांबा येथे भेट देत शेतकऱ्यांशी चर्चा केली. यानंतर उद्या कृषीमंत्री दादा भुसे (agriculture minister dada bhuse meet tomorrow puntamaba farmers) येणार असल्याचे किसान क्रांतीकडून (kisan kranti sanghatana) सांगण्यात आले. दरम्यान सकारात्मक चर्चा झाल्यास आंदोलनावर तोडगा निघण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संवाद साधून मागण्यांवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा घडवून आणली जाणार असल्याचे सांगितले होते. शुक्रवारी शिवसेनेचे उत्तर नगर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांनी आंदोलनाला भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा करून कृषी मंत्री दादा भुसे यांना मागण्यांबाबत माहिती दिली. यादरम्यान किसान कांतीच्या पदाधिकाऱ्यांशी दुरध्वनीवरून भुसे यांनी संवाद साधला व आपल्या मागण्यांवर सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले.
हे ही वाचा : Sugarcane Farmer : ठाकरे सरकारला जाग येणार का? शेतकरी आत्महत्या करतोय तरीही ऊस शेतातच, अद्यापही लाखो टन ऊस गाळपाविना
शनिवारी 4 मे रोजी सकाळी 10 वाजता कृषीमंत्री भुसे पुणतांबा येथे येणार असून मागण्यांवर योग्य निर्णय झाल्यास आंदोलन मागे घेतले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी शेतात • उभ्या असलेल्या ऊसाची मोळी पेटवून आणि दुध मोफत वाटून सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यात आला. श्रीगोंदा येथील कृषीकन्या शुभांगी माने हिने कवितेतून शेतकऱ्यांची व्यथा मांडली.
उसाला एकरी 1 हजार रुपये आणि शिल्लक उसाला हेक्टरी दोन लाख रुपये द्यावे. कांद्यासह सर्व पिकांना हमीभाव द्यावा. कांद्याला प्रतिक्विंटल पाचशे रुपये अनुदान द्यावे. शेतकऱ्यांना दिवसा पूर्णदाबाने वीज मिळावी. थकीत वीजबिल माफ झाले पाहिजे. कांदा आणि गव्हाची निर्यात बंदी उठवावी. सर्व पिकांना आधारभूत किंमत दिली जावी. 2017 साली केलेल्या कर्जमाफीची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी. नियमित कर्ज भरणारांचे अनुदान दिले जावे. दुधाला उसाप्रमाणे एफआरपी लागू केला जावी दुधाला कमीत कमी चाळीस रुपये दर दिला जावा. खासगी दूध संकलन केंद्रात होणारी लूट थांबवावी. या मागण्यासाठी पुणतांब्यात मागच्या तीन दिवसांपासून आंदोलन सुरु आहे.
हे ही वाचा : राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीचा संग्राम, महाविकास आघाडीचे ‘वर्षा’वर खलबतं
दरम्यान या आंदोलनास राज्यातील विविध शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. कृषी मुल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनीही भेट देऊन पाठिंबा दिला आहे. तसेच शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आंदोलनाला अद्याप भेट दिली नसताना सरकारने, मात्र तातडीने दखल घेतली असल्याने शेतकऱ्यांत समाधान व्यक्त केले जात आहे.
यावेळी सरपंच डॉ धनंजय धनवटे, धनंजय जाधव, सुहास वहाडणे, सुभाष कुलकर्णी, बाळासाहेब भोरकडे, मुरलीधर थोरात, सुभाष वहाडणे, नामदेव धनवटे बाळासाहेब चव्हाण, अनिल नळे, कमलाकर कोते, महेश कुलकर्णी, भास्कर मोटकर कृषीकन्या निकीता जाधव देवीदास सोनवणे, आबा नळे सुधाकर जाधव आदी उपस्थित होते.