मराठी बातम्या /बातम्या /agriculture /

आवक वाढताच सोलापूर बाजार समिती ठेवली जातेय बंद; कांदा उत्पादक संघटनेनं उघडला मोर्चा

आवक वाढताच सोलापूर बाजार समिती ठेवली जातेय बंद; कांदा उत्पादक संघटनेनं उघडला मोर्चा

कांद्याची विक्रमी आवक झाल्यानंतर लिलाव होण्यास वेळ लागतो, असं समितीचं म्हणणं आहे. त्यामुळं बाजार बंद ठेवावा लागतो. तर, दुसरीकडं महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघानं या निर्णयाला शेतकरीविरोधी ठरवत त्याविरोधात आघाडी उघडली आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 02 फेब्रुवारी : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत (Solapur Agricultural Produce Market Committee) सध्या कांद्याची (Onion) मोठी आवक होत आहे. सोलापुरात गेल्या 3-4 हंगामात कांद्याला चांगला भाव मिळाला आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडूतून कांदा बाजारात येत आहे. कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्यानं शेतकऱ्यांचा (Farmers) विचार न करता बाजार बंद करण्यात येत आहे. त्यामुळं शेतकरी संतप्त झाले. बाजार व्यवस्थापन मनमानी करत असल्याचा त्यांचा आरोप आहे. कांद्याची विक्रमी आवक झाल्यानंतर लिलाव होण्यास वेळ लागतो, असं समितीचं म्हणणं आहे. त्यामुळं बाजार बंद ठेवावा लागतो. तर, दुसरीकडं महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघानं या निर्णयाला शेतकरीविरोधी ठरवत त्याविरोधात आघाडी उघडली आहे.

टीव्ही 9 ने दिलेल्या बातमीनुसार, कांद्याची आवक वाढल्याचं कारण देत बाजार समिती बाजार बंद ठेवत असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे. त्यानंतर दोन दिवस थांबून कांद्याचे लिलाव सुरू केले जातात. त्यामुळं दुसऱ्या दिवशी आवक वाढल्याचा परिणामही भावावर होत आहे. ही बाब लक्षात घेऊन कांद्याचे लिलाव दररोज सुरू करावेत, अशी मागणी कांदा उत्पादक संघाचे नेते संदीप चिपडे यांनी केली आहे.

संघटना काय म्हणाली?

महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भरत दिघोळे यांनी टीव्ही-9 शी बोलताना सांगितलं की, सोलापूर बाजार समिती ज्या प्रकारे आवक वाढल्याचं कारण देत बाजार बंद ठेवत आहे, त्यामुळं कांदा उत्पादकांचं दुहेरी नुकसान होत आहे. कारण बाजारात अधिक आवक झाल्याचं सांगून एक ते दोन दिवस लिलाव थांबवले जात आहेत. यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं. शेतकऱ्यांकडून कमी भावात कांदा खरेदी केला जातो. त्यामुळं शेतकऱ्यांचंच नुकसान होत आहे. दिघोळे म्हणाले की, कांदा बाजार दररोज सुरू करावा, अशी मागणी कांदा संघानं केली आहे.

हे वाचा - Onion Farming: कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या टिप्स, यामुळे उत्पन्नात होईल भरघोस वाढ

संस्थेने लिहिलेले पत्र

संघटनेने यासाठी बाजार व्यवस्थापनाला पत्र दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून सोलापूर बाजार समितीत कांद्याची विक्रमी आवक होत असल्याचं बोललं जात आहे. कांद्याची एवढी मोठी आवक होणं, ही सोलापूरकरांसाठी अभिमानाची बाब आहे. मात्र, बाजार समितीनं कांद्याची जास्त आवक होत असल्याचं सांगून बाजार बंद करण्यास सुरुवात केली, ही धक्कादायक बाब आहे.

हे वाचा - Onion Remedies : खरंच सॉक्समध्ये कांदा घालून झोपल्यानं ताप कमी होतो?

सध्या बाजार समितीत येणारा कांदा हा खरीप हंगामातील लाल कांदा आहे. हा कांदा काढणीनंतर त्याची साठवण क्षमता कमी होते आणि शेतकऱ्यांना तो जास्त काळ शेतात ठेवता येत नाही. त्यामुळे या कांद्याच्या त्वरित विक्रीसाठी सोलापूर बाजार समितीने कामाला लागावे. काही झाले तरी कांद्याचे लिलाव रोजच सुरू असले पाहिजेत, असे संघटनेचे म्हणणे आहे.

First published:

Tags: Onion, Priceonion