Home /News /agriculture /

सोयाबीनच्या दरात सातत्याने वाढ; उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण, वाचा लेटेस्ट रेट

सोयाबीनच्या दरात सातत्याने वाढ; उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण, वाचा लेटेस्ट रेट

मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने राज्यातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारातही (International Market) सोयाबीनचे दर वाढत आहेत. हीच परिस्थिती पुढील काही काळ कायम राहणार असल्याने गतवर्षीचा विक्रमी दर यंदा शेतकऱ्यांना मिळू शकतो.

  मुंबई, 27 नोव्हेंबर : सोयाबीनच्या दरात सातत्याने वाढ होत (soybean latest Rate) असल्याने उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने राज्यातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारातही (International Market) सोयाबीनचे दर वाढत आहेत. हीच परिस्थिती पुढील काही काळ कायम राहणार असल्याने गतवर्षीचा विक्रमी दर यंदा शेतकऱ्यांना मिळू शकतो. कृषी बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे (soybean) दर प्रतिकिलो 100 ते 150 रुपयांपर्यंत वाढत आहेत तर काही ठिकाणी स्थिर आहेत. त्यामुळे आता भाव कमी होतील, असे बाजारातील वातावरण नाही. याशिवाय सोयाबीनच्या बोलीतही घट झाल्याने मागणी वाढत आहे. सरासरी साडेसहा हजार पोत्यांची आवक असताना शनिवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची केवळ एक हजार पोती आवक झाली. हे वाचा - मातोश्री ग्रामसमृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना; ग्रामपंचायतींना या तारखेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन सोयाबीनला विक्रमी भाव मिळण्याची अपेक्षा लातूर जिल्ह्यात खाद्यतेल प्रक्रिया करणारे उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. या उद्योजकांकडून अधिक सोयाबीन खरेदी करण्यात येत आहे. सोयाबीनची खरेदी केवळ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्येच नाही तर मुख्य गावांमधील स्थानिक खरेदी केंद्रांवरूनही केली जात आहे. मात्र, अशा खरेदी केंद्रांवर जास्त भाव मिळूनही शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी आणत नाहीत. त्याऐवजी स्टोरेजवर लक्ष केंद्रित आहे. पूर्वी बाजार समितीत 4 हजार 600 रुपये दर असतानाही सोयाबीनची 15 हजार ते 18 हजार गोणी येत होती. मात्र, आता हे दर साडेसहा हजार झाले आहेत. तरीही शनिवारी बाजारात अवघी 10 हजार पोती सोयाबीन पोहोचले. यंदा सोयाबीनला विक्रमी भाव मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. सोयाबीनचे लेटेस्ट दर -
  सोयाबिन Rate Per Unit in Rs.
  दिनांक जिल्हा जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत कमी दर सर्वसाधारण दर
  27/11/2021 अहमदनगर --- क्विंटल 118 6250 6650 6500
  27/11/2021 अहमदनगर लोकल क्विंटल 311 4500 6654 6400
  27/11/2021 अहमदनगर पिवळा क्विंटल 2 5900 5900 5900
  27/11/2021 अकोला पिवळा क्विंटल 6834 5925 6732 6310
  27/11/2021 अमरावती पिवळा क्विंटल 262 6375 6500 6450
  27/11/2021 औरंगाबाद --- क्विंटल 15 5000 6571 5785
  27/11/2021 औरंगाबाद पिवळा क्विंटल 13 6025 6400 6100
  27/11/2021 बीड --- क्विंटल 1025 5600 6548 6325
  27/11/2021 बीड पिवळा क्विंटल 308 5327 6485 6240
  27/11/2021 बुलढाणा पिवळा क्विंटल 1910 4850 6526 5688
  27/11/2021 धुळे हायब्रीड क्विंटल 3 6650 6650 6650
  27/11/2021 हिंगोली लोकल क्विंटल 900 6100 6800 6450
  27/11/2021 हिंगोली पिवळा क्विंटल 1446 5940 6513 6330
  27/11/2021 जळगाव --- क्विंटल 18 6050 6050 6050
  27/11/2021 जळगाव लोकल क्विंटल 38 5600 6500 6500
  27/11/2021 जालना लोकल क्विंटल 63 4950 6464 6100
  27/11/2021 जालना पिवळा क्विंटल 3829 5833 6483 6383
  27/11/2021 लातूर --- क्विंटल 4276 6650 6781 6715
  27/11/2021 लातूर पिवळा क्विंटल 10473 5948 6834 6474
  27/11/2021 नागपूर पिवळा क्विंटल 2736 4500 6560 6450
  27/11/2021 नांदेड --- क्विंटल 31 5900 6651 6551
  27/11/2021 नांदेड पिवळा क्विंटल 375 5950 6721 6335
  27/11/2021 नाशिक --- क्विंटल 414 3000 6675 6500
  27/11/2021 नाशिक पिवळा क्विंटल 54 4706 6578 6301
  27/11/2021 उस्मानाबाद --- क्विंटल 345 6511 6511 6511
  27/11/2021 उस्मानाबाद पिवळा क्विंटल 178 5100 6751 6318
  27/11/2021 परभणी पिवळा क्विंटल 294 6158 6653 6525
  27/11/2021 सातारा पांढरा क्विंटल 100 6800 7000 6900
  27/11/2021 सोलापूर लोकल क्विंटल 95 4970 6605 6500
  27/11/2021 वर्धा पिवळा क्विंटल 3125 5800 6510 6120
  27/11/2021 वाशिम पिवळा क्विंटल 6500 5500 6851 6200
  27/11/2021 यवतमाळ पिवळा क्विंटल 450 5500 5925 5738
  राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील) 46541
  दर सौजन्य - महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Soyabean rate, Soyabean rate in maharashtra

  पुढील बातम्या