Soybean Rate : लातूर बाजार समितीत का झाली सोयाबीनची विक्रमी आवक; वाचा लेटेस्ट सोयाबीन रेट

Soybean Rate : लातूर बाजार समितीत का झाली सोयाबीनची विक्रमी आवक; वाचा लेटेस्ट सोयाबीन रेट

दरही स्थिर राहिल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं. सोयाबीनचे (Soybean Rate) सप्टेंबर महिन्यासारखे भाव नसले तरी, पण भावाची चिंता न करता दिवाळीत सोयाबीन विकण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतल्याचे दिसून आले.

  • Share this:

मुंबई, 09 नोव्हेंबर : दिवाळीनिमित्त लातूर जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या बंद राहतात. पण लातूर कृषी उत्पन्न (Latur Agriculture market) बाजार समिती दिवाळी सणात फक्त एका दिवसासाठी पाडव्याला सुरू करण्यात आली होती. पाडव्यानिमित्त व्यापाऱ्यांनी दुकानाची पूजा केली आणि शेतकऱ्यांनी सोयाबीनही विकले. सलग सहा दिवस बाजार समिती बंद राहिल्यानंतर शुक्रवारी सोयाबीनची विक्रमी आवक दिसून आली. तसेच दरही स्थिर राहिल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं. सोयाबीनचे (Soybean Rate) सप्टेंबर महिन्यासारखे भाव नसले तरी, पण भावाची चिंता न करता दिवाळीत सोयाबीन विकण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतल्याचे दिसून आले. शुक्रवारी बाजारात 40 हजार पोती पोहोचली होती. त्यामुळे पाडव्याच्या दिवशी व्यापाऱ्यांची दिवाळी गोड झाली आणि बाजारपेठेत चैतन्य निर्माण झाले.

सहा दिवसांनी बाजार समिती सुरू झाली

दिवाळीनिमित्त लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती गेल्या रविवारपासून बंद असल्याने पाडव्याच्या सणाच्या दिवशीच व्यवहार होतात हे शेतकऱ्यांना माहीत होते. त्यामुळेच शुक्रवारी पाडव्याच्या सणाच्या दिवशी सुमारे 40 हजार पोती बाजारात पोहोचली. सलग सहा दिवस बाजार समिती बंद ठेवल्याचाही हा परिणाम होता. मात्र, शुक्रवारच्या आवकनुसार सोयाबीनचा भाव काहीही असला तरी त्याची विक्री करण्याबाबत शेतकरी अधिक दक्ष दिसले.

हे वाचा - 35 हजार रुपये कमावणारा IT इंजिनिअर बनला शेतकरी, महिनाकाठी कमावतोय लाखो रुपये

सोयाबीनचा सरासरी भाव 5150

गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनचे दर स्थिर आहेत. केंद्र सरकारच्या धान्य साठ्यावर मर्यादा घालण्याच्या निर्णयाची मुदत संपली आहे. त्यामुळे कदाचित व्यापाऱ्यांनी साठवणूक सुरू केली आहे त्यामुळे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे. तरीही दर स्थिर राहिल्याने शेतकरी सुखावला आहे. किमान भाव उतरत नसल्याची मोठी बाब म्हणजे लातूर, उस्मानाबाद, बीड, अंबाजोगाई, सोलापूर, कर्नाटक येथून सोयाबीनची आयात करण्यात आली असली तरी बाजारभावाचा अंदाज लावला गेला नाही.

हे वाचा - Anand Rathi चा ‘या’ मल्टिबॅगर स्टॉकमध्ये गुंतवणुकीचा सल्ला, यावर्षी शेअरमध्ये 145 टक्क्यांची वाढ

राज्यातील विविध बाजार समित्यांमधील आजचे सोयाबीनचे बाजारभाव -

दिनांक जिल्हा जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत कमी दर सर्वसाधारण दर
09/11/2021 अहमदनगर --- क्विंटल 96 4480 5101 4850
09/11/2021 अहमदनगर लोकल क्विंटल 371 4000 5230 5001
09/11/2021 अहमदनगर पिवळा क्विंटल 11 4700 4900 4900
09/11/2021 अकोला पिवळा क्विंटल 6716 4425 5498 5000
09/11/2021 अमरावती पिवळा क्विंटल 1648 4000 5145 4650
09/11/2021 औरंगाबाद --- क्विंटल 148 4550 4978 4825
09/11/2021 औरंगाबाद पिवळा क्विंटल 6 4697 4950 4740
09/11/2021 बीड --- क्विंटल 2310 4375 5098 4875
09/11/2021 बीड पिवळा क्विंटल 204 4100 5126 4951
09/11/2021 बुलढाणा लोकल क्विंटल 2450 4200 5255 5000
09/11/2021 बुलढाणा पिवळा क्विंटल 2511 4100 5150 4530
09/11/2021 हिंगोली लोकल क्विंटल 1000 4650 5280 4965
09/11/2021 हिंगोली पिवळा क्विंटल 1766 4727 5387 4982
09/11/2021 जळगाव --- क्विंटल 66 4200 4900 4800
09/11/2021 जळगाव पिवळा क्विंटल 36 4125 5000 4620
09/11/2021 जालना पिवळा क्विंटल 7233 4297 5083 4983
09/11/2021 लातूर --- क्विंटल 6400 5000 5150 5075
09/11/2021 लातूर पिवळा क्विंटल 997 4602 5170 4953
09/11/2021 नागपूर पिवळा क्विंटल 165 2600 5000 4350
09/11/2021 नांदेड पिवळा क्विंटल 585 3535 5209 4372
09/11/2021 नाशिक --- क्विंटल 832 3000 5371 5290
09/11/2021 उस्मानाबाद --- क्विंटल 275 5000 5000 5000
09/11/2021 परभणी पिवळा क्विंटल 487 4783 5200 5050
09/11/2021 पुणे --- क्विंटल 3 4700 4700 4700
09/11/2021 सोलापूर लोकल क्विंटल 5 4900 5075 4900
09/11/2021 वर्धा पिवळा क्विंटल 1174 3767 5237 4600
09/11/2021 वाशिम --- क्विंटल 10000 4325 5105 4640
09/11/2021 वाशिम पिवळा क्विंटल 9116 4375 5303 5013
09/11/2021 यवतमाळ पिवळा क्विंटल 250 4500 5075 4900
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील) 56861

दर सौजन्य - महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ

Published by: News18 Desk
First published: November 9, 2021, 7:21 PM IST

ताज्या बातम्या