हमीभावापेक्षाही खाली घसरले सोयाबीनचे दर; 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसं होणार?

हमीभावापेक्षाही खाली घसरले सोयाबीनचे दर; 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसं होणार?

पूर आणि अवकाळी पावसातून तग धरलेल्या सोयाबीन पिकाला आता दराचा फटका बसू लागला आहे. सोयाबीनचा दर (Soybean Price) काही बाजार समित्यांमध्ये किमान आधारभूत किंमती (MSP) पेक्षा कमी झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 04 नोव्हेंबर : राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. पूर आणि अवकाळी पावसातून तग धरलेल्या सोयाबीन पिकाला आता दराचा फटका बसू लागला आहे. सोयाबीनचा दर (Soybean Price) काही बाजार समित्यांमध्ये किमान आधारभूत किंमती (MSP) पेक्षा कमी झाला आहे. कांद्यानंतरचे राज्यातील हे दुसरं प्रमुख पीक आहे. सुमारे 40 लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड केली जाते. नवीन सोयाबीन (Soybean latest rate) बाजारात आल्यापासून सातत्याने दर कमी झाले आहेत. त्यामुळं 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणार तरी कसे? असा प्रश्न केला जात आहे.

मंगळवारी नागपूर जिल्ह्यातील काटोल मंडईत सोयाबीनची प्रतिक्विंटल किंमत 3,680 रुपये होती. तर किमान भाव केवळ तीन हजार रुपये प्रतिक्विंटल होता. तर 2021-22 साठी सोयाबीनची किमान आधारभूत किंमत (MSP) 3950 रुपये प्रति क्विंटल घोषित करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातही अशीच परिस्थिती आहे. जिल्ह्यातील परतूर मंडईत केवळ ३,५०० रुपये क्विंटलने सोयाबीन विकले जाते.

हे वाचा - PICS: नौशेरामध्ये जवानांना मिठाई भरवून PM मोदींनी साजरी केली दिवाळी, ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी दुमदुमला परिसर

संपूर्ण राज्यात कुठेही सोयाबीनचा कमाल भाव 6000 रुपयांपर्यंत पोहोचू शकलेला नाही. अशा स्थितीत अनेक शेतकरी आता सोयाबीन विकण्याऐवजी साठवून ठेवण्याचे धोरण आखत आहेत. मोहरीप्रमाणे सोयाबीनचे भावही पुन्हा वाढतील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. सध्याच्या दरांना सोयाबीन विकून उत्पादन खर्चही भागणं मुश्कील आहे, असे अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

हे वाचा - कहर! जर्मनीत कोरोनाने तोडले सर्व रेकॉर्ड, 24 तासात अचानक वाढली रुग्णसंख्या

राज्यातील विविध बाजार समित्यांमधील दर -

दिनांक जिल्हा जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत कमी दर सर्वसाधारण दर
04/11/2021 नंदुरबार पिवळा क्विंटल 40 5000 5200 5150
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील) 40
03/11/2021 अहमदनगर पिवळा क्विंटल 3 4700 4700 4700
03/11/2021 औरंगाबाद --- क्विंटल 85 4000 5200 4700
03/11/2021 बीड --- क्विंटल 5 4500 5051 4800
03/11/2021 बीड पिवळा क्विंटल 203 4100 4955 4500
03/11/2021 बुलढाणा पिवळा क्विंटल 78 3500 5150 4700
03/11/2021 चंद्रपुर पिवळा क्विंटल 183 4400 5300 5000
03/11/2021 हिंगोली लोकल क्विंटल 340 4800 5200 5000
03/11/2021 जालना पिवळा क्विंटल 209 4000 5100 4500
03/11/2021 नागपूर लोकल क्विंटल 2588 4400 5750 5413
03/11/2021 नागपूर पिवळा क्विंटल 120 3900 5111 4560
03/11/2021 नांदेड पिवळा क्विंटल 294 4302 5260 4768
03/11/2021 नंदुरबार पिवळा क्विंटल 85 4900 5200 5100
03/11/2021 परभणी पिवळा क्विंटल 319 4950 5200 5050
03/11/2021 वर्धा पिवळा क्विंटल 62 4500 5260 5100
03/11/2021 यवतमाळ पिवळा क्विंटल 1961 4412 5149 4940
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील) 6535
02/11/2021 अहमदनगर --- क्विंटल 77 4700 5360 5100
02/11/2021 अकोला पिवळा क्विंटल 7930 4250 5200 4900
02/11/2021 अमरावती --- क्विंटल 400 4000 5300 4650
02/11/2021 औरंगाबाद --- क्विंटल 121 3800 5305 4800
02/11/2021 औरंगाबाद पिवळा क्विंटल 24 3600 5141 4889
02/11/2021 बीड --- क्विंटल 1857 4200 5200 4900
02/11/2021 भंडारा पिवळा क्विंटल 3 4000 4000 4000
02/11/2021 चंद्रपुर --- क्विंटल 1242 4100 5320 4800
02/11/2021 चंद्रपुर पिवळा क्विंटल 2924 3935 5252 4649
02/11/2021 हिंगोली पिवळा क्विंटल 2014 4400 5133 4833
02/11/2021 जळगाव पिवळा क्विंटल 55 3000 5260 4865
02/11/2021 जालना पिवळा क्विंटल 7332 4175 5225 5080
02/11/2021 नागपूर पिवळा क्विंटल 280 3925 5316 4798
02/11/2021 नांदेड --- क्विंटल 70 4900 5150 5050
02/11/2021 नांदेड पिवळा क्विंटल 681 4150 5086 4610
02/11/2021 नंदुरबार पिवळा क्विंटल 230 4799 5462 5256
02/11/2021 उस्मानाबाद --- क्विंटल 650 5225 5225 5225
02/11/2021 परभणी --- क्विंटल 333 3000 5200 3000
02/11/2021 परभणी पिवळा क्विंटल 1073 4830 5231 5080
02/11/2021 सोलापूर लोकल क्विंटल 56 4925 5280 5150
02/11/2021 वर्धा पिवळा क्विंटल 890 3833 5323 4867
02/11/2021 वाशिम पिवळा क्विंटल 2245 4400 5335 4900
02/11/2021 यवतमाळ पिवळा क्विंटल 2362 4363 5196 4875
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील) 32849

Published by: News18 Desk
First published: November 4, 2021, 7:03 PM IST

ताज्या बातम्या