Home /News /agriculture /

राकेश टिकैत पुन्हा action mode मध्ये; मोदी आणि योगी सरकारविरोधात लवकरच मोठे आंदोलन

राकेश टिकैत पुन्हा action mode मध्ये; मोदी आणि योगी सरकारविरोधात लवकरच मोठे आंदोलन

राकेश टिकैत यांचा केंद्र सरकारला तीन कृषी कायदे मागे घ्यायला लावण्यात मोठा वाटा होता. राकेश टिकैत पुन्हा action mode वर आले आहेत. (farmers leader rakesh tikait

  नवी दिल्ली, 28 मे : मागच्या दीड वर्षांपूर्वी पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशसह अन्य राज्यातील शेतकरी तीन कृषी कायदे (agriculture law) रद्द करण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर (Delhi border) ठाण मांडून बसले होते. दरम्यान विविध शेतकरी संघटनांना (shetkari sanghtana) एकसंध बांधण्यासाठी शेतकरी नेते राकेश टिकैत (farmers leader rakesh tikait) यांनी मोठे यश मिळवले होते. राकेश टिकैत यांचा केंद्र सरकारला तीन कृषी कायदे मागे घ्यायला लावण्यात मोठा वाटा होता. राकेश टिकैत पुन्हा action mode वर आले आहेत. सरकारकडून शेतकऱ्यांवर पूर्ण अत्याचार होत आहेत. सरकार शेतकऱ्यांशी चर्चा टाळत असून, येणाऱ्या काळात मोठे शेतकऱ्यांचे आंदोलन उभारणार असल्याचा इशारा शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी दिला आहे.

  टिकैत यांनी केंद्र सरकारचा चांगलाच समाचार घेतला, बागपतमधील चौगामा भागातील गंगनौली गावात शेतकऱ्यांची पंचायत झाली. या पंचायतीमध्ये बोलताना राकेश टिकैत यांनी केंद्र सरकार जोरदार निशाणा साधला. केंद्रातल्या सरकार एकतर्फी कारभार करत आहे. त्यांना कोणाची जाण राहिली नाही. सरकारकडून शेतकऱ्यांवर पूर्ण अत्याचार होत आहेत. सरकार शेतकऱ्यांशी चर्चा टाळत असून, येणाऱ्या काळात मोठे शेतकऱ्यांचे आंदोलन उभारणार असल्याचा इशारा शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी दिला.

  हे ही वाचा : ...तर थोबाडीत मारल्याशिवाय राहणार नाही, बच्चू कडूंनी महावितरणच्या अधिकाऱ्याला झापले, VIDEO

  बागपत येथील पंचायतीमध्ये मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी बोलताना राकेश टिकैत म्हणाले कि, केंद्रातील सरकार एफआरपीचे दोन तुकडे करत आहे यावर आपल्याला जन आंदोलन उभारून हो मोडीत काढावे लागेल. याचबरोबर शेतीच्या पंपाचे मीटर बसवण्याबाबत सरकारविरोधात आवाज उठवावा लागेल. सरकारकडून शेतकऱ्यांवर पूर्ण अत्याचार होत आहेत, सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचे टाळत असून, येणाऱ्या काळात आंदोलन करणार असल्याचा इशारा राकेश टिकैत यांनी दिला.

  ज्यावेळी मोदी सरकार सत्तेत आले त्यावेळी सगळ्या शेतकऱ्यांना मोफत वीज देणार असल्याचे त्यांनी सांगितले त्याचे काय झाले. सरकार शेतकऱ्यांच्या मुद्दावर कुठेही चर्चा करताना दिसत नाही. 

  हे ही वाचा : 'माझ्या वडिलांचा मी आदरच करतो, पण...', वडिलांच्या टीकेवर संभाजीराजेंची पहिली प्रतिक्रिया

  शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन काम न करता सरकारला पुन्हा वातावरण बिघडवायचे आहे का? असा सवाल देखील यावेळी राकेश टिकैत यांनी केला. सरकारने शेतकऱ्यांशी बसून चर्चा करावी. तसे न करणे हा संपूर्ण निषेधार्ह आहे. तसेच उत्तर प्रदेश सरकार कूपनलिकांवर मीटर बसवत आहे. यावर आपल्याला मोठे जनआंदोलन उभा करणार असल्याचा असा इशारा त्यांनी दिला.

  उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊला सरकारविरोधात आंदोलन करताना आपल्याला ट्रॅक्टर मोर्चा काढायचा आहे. सरकारने आम्हाला गोळ्या घातल्या तरी चालतील पण मागे हटायचे नाही असेही ते म्हणाले. आंदोलनाशिवाय सरकारे चालत नाहीत. त्याचबरोबर 29 मे रोजी हरिद्वारमध्ये होणाऱ्या महापंचायतीत शेतकऱ्यांनी उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन देखील यावेळी राकेश टिकैत यांनी केले.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Agricultural law, Farmer, Farmers protest, Modi government, Yogi Aadityanath

  पुढील बातम्या