मुंबई, 08 मे : सध्या युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात खाद्यतेलाच्या किंमतीत जवळजवळ 25 टक्क्यांनी वाढ झाली. दोन्ही देशांमधील युद्ध कधी संपणार याबाबत कोणतीही दिशा स्पष्ट दिसून येत नाही. दरम्यान युक्रेनमध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात खाद्यतेल तयार होत असल्याने तेलाचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. सूर्यफुल तेलाचे (sunflower oil rate hike) दर सध्या भारतात 200 रुपयांवर गेल्यामुळे सामान्य माणसाच्या खिशाला आणखी झळ बसली आहे. याचबरोबर अल्पभुदारक शेतकऱ्यांनाही याचा मोठा फटका बसला आहे. यासाठी सूर्यफुलाची शेती (sunflower farming) सध्या शेतकऱ्यांनी केल्यास याचा फायदा होण्याची शक्यता आहे.
सूर्यफुलाची शेती कमी कालावधीची शेती
सूर्यफुल हे एक बहुगुणी, कमी कालावधीत येणारे पीक आहे, याचबरोबर कोणत्याही हंगामात हे पीक घेता येत असल्याने कोणत्याही ठिकाणी या पिकाची उगवण क्षमचा चांगली असणार आहे. कमी पाण्यात तयार होणारे असे अत्यंत उपयुक्त पीक आहे. या पिकाचे रब्बी हंगामात अपेक्षित उत्पादन मिळवायचे पेरणी, आणि बिजप्रक्रिया व्यवस्थित होणे गरजेचे ठरणार आहे.
हे ही वाचा : Mansoon 2022 : यंदा वरुणराजा लवकर बरसणार, 10 दिवस आधीच होणार मान्सूनचं आगमन
पेरणी ः रब्बी हंगामासाठी सूर्यफुलाची पेरणी ऑक्टोबरचा पहिला पंधरवडा ते नोव्हेंबरचा पहिला पंधरवडा या दरम्यान करावी. मध्यम ते खोल जमिनीत 45 बाय 15 से. मी., भारी जमिनीत 60 बाय 30 से. मी. आणि जास्त कालावधीच्या वाणांची लागवड 60 बाय 30 से. मी. अंतरावर करावी. कोरडवाहू सूर्यफुलाची पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करावी. बी आणि खत एकाच वेळी पेरता येते. बियाणे 5 से. मी. पेक्षा जास्त खोल पेरू नये. बागायती पिकाची लागवड सरी वरंब्यावर टोकण पद्धतीने करावी. पेरणीसाठी सुधारित वाणाचे 8-10 किलो बियाणे आणि संकरित वाणाचे 5 ते 6 किलो बियाणे प्रती हेक्टरी वापरावे.
बीजप्रक्रिया ः मर रोगाच्या प्रतिबंधासाठी 2 ते 2.5 ग्रॅम थायरम किंवा ब्रासिकॉल प्रती किलो बियाण्यास चोळावे. केवडा रोग टाळण्यासाठी 6 ग्रॅम अॅप्रीन 35 एस. डी. प्रती किलो बियाण्यास चोळावे. तसेच विषाणूजन्य (नॅक्रॉसिस) रोगाच्या प्रतिबंधासाठी इमिडॅक्लोप्रिड 70 डब्ल्यू. ए. गाऊचा 5 ग्रॅम प्रती किलो बियाण्यास लावावे. त्यानंतर अॅझोटोबॅक्टर हे जिवाणू खत 25 ग्रॅम प्रती किलो बियाण्यास पेरणीपूर्व लावावे.
राज्यातील कोणत्याही भागात हे पीक आपण घेऊ शकतो. जास्त करून कमी पाण्याच्या क्षेत्रात हे पीक मोठ्या जोमाने येते. यामुळे हिंगोली, परभणी, सोलापूर, अकोला, या भागात हे पीक घेण्यास वातावरण जास्त अनुकूल आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.