जाहिरात
मराठी बातम्या / मनी / कृषी / औरंगाबादकरांसाठी आता खऱ्या अर्थाने आंबा 'महोत्सव', एकदा बाजारात जाऊन तर बघा, VIDEO

औरंगाबादकरांसाठी आता खऱ्या अर्थाने आंबा 'महोत्सव', एकदा बाजारात जाऊन तर बघा, VIDEO

औरंगाबादकरांसाठी आता खऱ्या अर्थाने आंबा 'महोत्सव', एकदा बाजारात जाऊन तर बघा, VIDEO

औरंगाबाद शहरातील बाजारपेठेमध्ये आंब्याची आवक वाढल्यामुळे आंब्याचे दर आता कमी झाले आहेत. लालबाग, केसर, पायरी आंबा बाजारपेठेमध्ये 50 ते 100 रुपये किलोप्रमाणे विकला जात आहे. तर, हापूस आंब्याचे दर 400 वरून 200 रुपयांवर आलेले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

    औरंगाबाद, 6 जून : शहरातील बाजारपेठेमध्ये आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे आंब्याचे दर (Mango prices) आता कमी झाले आहेत. हंगामाच्या शेवटी आंब्याच्या किमती कमी झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा आमरस गोड होणार आहे. उन्हाळा सुरू झाल्यानंतर सर्वांनाच आंब्याची चव चाखायची असते. मात्र, सुरुवातीला आंब्याचा किमती सामान्यांच्या आवाक्यात नव्हत्या. पण, आता बाजारात आवाक (Aurangabad market) वाढल्याने आंबा आता स्वस्त होत आहे. आतापासून आंब्यांचा हंगाम संपत आला आहे आणि यातच आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे आंब्याचे किमती कमी झाल्या आहेत. यामध्ये केसरी, बदाम, लंगडा, हापूस आंब्याला मोठी मागणी बाजारपेठेत आहे. पिवळ्याधमक आंब्यापेक्षा कृत्रिम पद्धतीने पिकविलेल्या आंब्यांना द्यावी पसंती मिळत आहेत. वाचा :  Onion Rate : राज्यातील राहाता बाजार समितीत कांद्याचे ‘वांदे’ मिटले, दरात झाली एवढी वाढ लालबाग, केसर, पायरी आंबा बाजारपेठेमध्ये 50 ते 100 रुपये किलोप्रमाणे विकला जात आहे. तर, हापूस आंब्याचे दर 400 वरून 200 रुपयांवर आलेले आहेत. आंब्याचा सीझन संपत असल्याने त्यासोबतच पाऊस अवघ्या काही दिवसांवर आल्याने पाऊस पडल्याचे आंब्यांचे किमती आणखी कमी होतील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले आहेत.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात