मराठी बातम्या /बातम्या /agriculture /

India@75: अशा प्रमुख कृषी क्रांती, ज्याने भारताचा जगभर दबदबा; काही तुम्हाला माहितही नसतील

India@75: अशा प्रमुख कृषी क्रांती, ज्याने भारताचा जगभर दबदबा; काही तुम्हाला माहितही नसतील

सामान्यत: लोकांना हरित क्रांती आणि श्वेतक्रांती बद्दल माहिती आहे. पण, देशाला पुढे नेण्यासाठी इतर कृषी क्रांती देखील वेळोवेळी सुरू झाल्या आहेत. त्यांच्याबद्दल जाणून घ्या.

सामान्यत: लोकांना हरित क्रांती आणि श्वेतक्रांती बद्दल माहिती आहे. पण, देशाला पुढे नेण्यासाठी इतर कृषी क्रांती देखील वेळोवेळी सुरू झाल्या आहेत. त्यांच्याबद्दल जाणून घ्या.

सामान्यत: लोकांना हरित क्रांती आणि श्वेतक्रांती बद्दल माहिती आहे. पण, देशाला पुढे नेण्यासाठी इतर कृषी क्रांती देखील वेळोवेळी सुरू झाल्या आहेत. त्यांच्याबद्दल जाणून घ्या.

  यंदा भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. एकेकाळी भारत आपले अन्नधान्य इतर देशांकडून आयात करत होता. आज तो या बाबतीत स्वयंपूर्ण आहे. पण, हे काही एकदोन दिवसात घडलं नाही. अनेक क्रांतीकारी योजनांचा यामागे मोठा हातभार आहे. देशातील जनतेच्या मनात दोन मोठ्या कृषी क्रांती आहेत. पहिली हरित क्रांती आणि दुसरी श्वेतक्रांती. दोघांनी आपापल्या क्षेत्रात देशाला प्रगतीच्या मार्गावर नेले. जवळपास प्रत्येक पंतप्रधानाने आपल्या कार्यकाळात शेतीच्या प्रगतीसाठी काही ना काही क्रांती केली आहे. सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मधमाशी पालन आणि संबंधित क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी 2016 मध्ये गोड क्रांती सुरू केली. देशातील प्रमुख कृषी क्रांतींबद्दल जाणून घेऊया. ज्याद्वारे या क्षेत्रात गुणात्मक बदल झाला. हरित क्रांती देशात कृषी उत्पादन वाढवण्यासाठी 1966-67 मध्ये हरित क्रांतीची औपचारिक सुरुवात झाली. या माध्यमातून कृषी क्षेत्रातही आवश्यक सुधारणा राबवण्यात आल्या. श्वेत क्रांती देशात दूध उत्पादन वाढवण्यासाठी श्वेतक्रांती (White Revolution) सुरू झाली. वर्गीस कुरियन यांना या क्रांतीचे जनक म्हटले जाते. त्याला ऑपरेशन फ्लड असेही म्हणतात. याची सुरुवात 1970 मध्ये झाली. आज आपण दूध उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहोत. निळी क्रांती मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील प्रगतीसाठी याची सुरुवात करण्यात आली. त्याची सुरुवात सातव्या पंचवार्षिक योजना (1985 ते 1990) दरम्यान झाली. त्यामुळे मत्स्यपालन, प्रजनन, विपणन आणि निर्यातीमध्ये बरीच सुधारणा झाली.

  India@75: अशा 10 भारतीय महिला शास्त्रज्ञ, ज्यांनी आपल्या कामानं जगाला केलं अचंबित

  पिवळी क्रांती ती तेलबिया उत्पादनाशी संबंधित आहे. तेलबियांमध्ये भारत खूप मागे होता. उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यासाठी याची सुरुवात करण्यात आसी. फक्त तेलबियांसाठी मोहरी मोहीम सुरू करण्यात आली आहे. वास्तविक तेलबियांसाठी सूर्यफूल, सोयाबीन, भुईमूग, एरंड, तीळ, राई आणि मोहरी, जवस आणि करडई या नऊ पिकांचा तेलबियांमध्ये समावेश केला गेला. लाल क्रांती देशात मांस आणि टोमॅटो उत्पादनाला चालना देण्यासाठी लाल क्रांती सुरू झाली. तर गुलाबी क्रांती झिंग्याचे उत्पादन वाढवण्यासाठी सुरू करण्यात आले. गोल क्रांती हे बटाट्याचे उत्पादन वाढविण्याशी संबंधित आहे. केंद्रीय बटाटा संशोधन संस्था, शिमला यांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञान आणि रोग प्रतिरोधक जातींमुळे भारतात बटाट्याची क्रांती शक्य झाली. चीननंतर भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा बटाटा उत्पादक देश आहे. India@75: गोळ्यांचा वर्षाव होत असताना ग्रेनेड घेऊन शत्रुच्या तंबूत शिरला अन्.. असामान्य पराक्रमाची गाथा सुवर्ण क्रांती हे फळ उत्पादनाशी संबंधित आहे. फळबागा, बियांच्या विकासासाठी 2005-06 मध्ये राष्ट्रीय फलोत्पादन अभियान सुरू करण्यात आले. भारत फळ उत्पादनात सातत्याने प्रगती करत आहे. हरित सुवर्ण क्रांती हे बांबू उत्पादनाशी संबंधित आहे. भारतात बांबूची सर्वात जास्त जंगले आहेत. देशात बांबूच्या 136 जाती आहेत. यापैकी 89 जाती ईशान्य भागात आढळतात. बांबूच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी आता सरकारने त्याला गवताच्या श्रेणीत टाकले आहे. इतर क्रांती याशिवाय केशर उत्पादन वाढीसाठी केशर क्रांती, मसाले उत्पादनासाठी बदामी क्रांती आणि खत उत्पादनासाठी ग्रे क्रांती सुरू करण्यात आली.
  Published by:Rahul Punde
  First published:

  Tags: Achievements@75, Agriculture, Independence day

  पुढील बातम्या