मराठी बातम्या /बातम्या /agriculture /Local 18 : पारंपारिक शेती सोडून काढली मिरची अन् कोरोना काळात बनले लखपती!

Local 18 : पारंपारिक शेती सोडून काढली मिरची अन् कोरोना काळात बनले लखपती!

नगदी शेतीकडे वाटचाल करणार्‍या या शेतकर्‍याच्या मते शासनाने त्यांना सहकार्य केल्यास शेतकर्‍यांचं नशीब शेतीमुळे बदलू शकतं.

नगदी शेतीकडे वाटचाल करणार्‍या या शेतकर्‍याच्या मते शासनाने त्यांना सहकार्य केल्यास शेतकर्‍यांचं नशीब शेतीमुळे बदलू शकतं.

नगदी शेतीकडे वाटचाल करणार्‍या या शेतकर्‍याच्या मते शासनाने त्यांना सहकार्य केल्यास शेतकर्‍यांचं नशीब शेतीमुळे बदलू शकतं.

  • Local18
  • Last Updated :
  • Mumbai, India

    बक्सर : असं म्हणतात की कष्ट करण्याची तयारी असेल, तर खडकाळ जमिनीवरही माळरान फुलवता येतं. त्यासाठी तुमची तयारी असावी लागते. बिहार राज्यातल्या डुमरावमधल्या दक्षिण टोला इथले शेतकरी पिंटू राय यांनी हे वाक्य खरं करून दाखवलं आहे. ते सुरुवातीच्या काळात पारंपरिक पद्धतीने शेती करत होते.

    त्यात नुकसान होऊनही ते हिंमत हरले नाहीत आणि नंतर इंटिग्रेटेड फार्मिंगमध्ये त्यांनी नशीब आजमावलं व चांगली कमाई केली. आता ते सिमला मिरचीची लागवडही मोठ्या प्रमाणावर करत आहेत. पिंटू यांनी परिसरात सिमला मिरची लागवड सुरू करून कृषी क्षेत्रात उत्तम कामगिरी केली आहे. आता सिमला मिरचीचं पीक शेतात डोलत आहे. नगदी शेतीकडे वाटचाल करणार्‍या या शेतकर्‍याच्या मते शासनाने त्यांना सहकार्य केल्यास शेतकर्‍यांचं नशीब शेतीमुळे बदलू शकतं.

    पिंटू राय यांनी सांगितलं, की ते 2015पासून सेंद्रिय शेती करत असले, तरी 2020मध्ये त्यांनी 1 एकर क्षेत्रावर सिमला मिरची लागवड सुरू केली. फायदा झाल्यावर लागवड क्षेत्र तीन एकरवर नेलं. यात एका एकरात 1 लाख रुपये खर्च यायचा आणि नफा अडीच पट असायचा. गेल्या वर्षी त्यांना एकरी दीड लाख रुपयांपेक्षा जास्त नफा झाला होता. या वर्षी थोडी मंदी आहे; पण तरीही नफा चांगला होईल. नीलगाय व जंगली प्राण्यांपासून पीक वाचवण्यासाठी शेताला कुंपण केल्याने ती समस्याही नसल्याचं त्यांनी सांगितलं.

    15 एकरात सिमला मिरचीचं पीक

    शेतीत काही वेगळे प्रयोग करू इच्छिणाऱ्यांसाठी पिंटू प्रेरणास्रोत बनले आहेत. डुमरावच्या शेतकऱ्यांनी पिंटू राय यांच्याकडून प्रेरणा घेऊन 15 एकरमध्ये सिमला मिरचीची लागवड केली आहे. साधारणपणे सिमला मिरचीची लागवड पॉलिहाउसमध्ये केली जाते.

    परंतु इथल्या शेतकऱ्यांनी मोकळ्या शेतात सिमला मिरचीची लागवड केली आहे. यातून मार्चपर्यंत उत्पन्न मिळत असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. कृषी समन्वयक दिलीप कुमार यांनी सांगितलं, की शेतकरी सिमला मिरचीची यशस्वीरीत्या लागवड करत आहेत. त्यासाठी ते वेळोवेळी कृषी तज्ज्ञांची मदतही घेत आहेत. डुमराव इथले शेतकरी पारंपरिक शेती सोडून नगदी पिकांकडे वेगाने वाटचाल करत आहेत. डुमराव आणि नया भोजपूरमध्ये सध्या सुमारे पंधरा एकर क्षेत्रावर सिमला मिरचीची लागवड करण्यात आली आहे.

    चांगल्या आरोग्यासाठी सिमला मिरची उपयुक्त

    सिमला मिरचीमध्ये आढळणारे गुणधर्म आरोग्यासाठी खूप उपयुक्त मानले जातात. सिमला मिरचीची लागवड जगभरात केली जाते. हिरव्या सिमला मिरचीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, फायबर्स, कॅरोटिनॉइड्स मुबलक प्रमाणात आढळतात. ते आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. सिमला मिरचीमध्ये कॅलरीज खूप कमी असतात. त्यामुळे कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवता येते. हिरवी सिमला मिरची अँटीऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे. हिरव्या सिमला मिरचीचं सेवन केल्यास हृदय निरोगी राहायला मदत होते.

    कृषी तज्ज्ञांच्या मते, सिमला मिरचीत अनेक पौष्टिक घटक असतात. शेतकऱ्यांनी मिल्डिंग पद्धती आणि ड्रिप इरिगेशनचा वापर केल्यास कमी पाण्यात सिमला मिरचीचं चांगलं उत्पादन घेता येतं.

    First published: