जाहिरात
मराठी बातम्या / मनी / कृषी / Nagpur News : मिरचीनं शेतकऱ्यांना हसवलं, निर्यात वाढल्यानं आले 'अच्छे दिन'

Nagpur News : मिरचीनं शेतकऱ्यांना हसवलं, निर्यात वाढल्यानं आले 'अच्छे दिन'

Nagpur News : मिरचीनं शेतकऱ्यांना हसवलं, निर्यात वाढल्यानं आले 'अच्छे दिन'

Chilies Export : कोणत्याही खाद्यपदार्थाला तिखट तडका देण्यासाठी हमखास वापरण्यात येणाऱ्या लाल मिरचीला अच्छे दिन आले आहेत.

  • -MIN READ Nagpur,Maharashtra
  • Last Updated :

    नागपूर, 22 फेब्रुवारी : कोणत्याही खाद्यपदार्थात झणझणीत तिखटपणा आणण्यासाठी मिरचीचा वापर केला जातो. मिरची हे देशातील एक महत्त्वाचे पीक असून लाल मिरचीला जगभरातून मागणी आहे. लाल मिरचीच्या उत्पन्नात आणि निर्यातीमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. कोणत्याही खाद्यपदार्थाला तिखट तडका देण्यासाठी हमखास वापरण्यात येणाऱ्या लाल मिरचीला अच्छे दिन आले आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठ्या बाजारपेठेपैकी एक असलेल्या नागपुरातील कळमना मार्केटमध्ये लाल मिरचीला समाधानकारक भाव मिळत आहे. काय आहे परिस्थिती ? कळमना बाजारात 2400 हून अधिक टन मिरची दाखल झाली असून 120 टन मिरची दररोज निर्यात होत आहे. आगामी काळात मिरचीची निर्यात आणखी वाढेल अशी अपेक्षा मिरची व्यापारी व्यक्त करत आहे. मागच्या वर्षीपेक्षा यंदा मिरचीच्या दरात 25 ते 30 टक्के वाढ झालीय. गेल्या तीन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय बाजारातील अनुकूल परिस्थितीमुळे मिरची उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होत आहे. 2019 नंतर चीन, मलेशिया, इंडोनेशिया, बांगलादेश, श्रीलंका, चीन, थायलंड, अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, व्हिएतनाम, , सौदी अरेबिया, नेदरलँड, जपान, स्वीडन, कॅनडा, इराण, ऑस्ट्रेलिया, इटली यांसह इतरही देशांमध्ये भारतीय मिरचीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे., गतवर्षीच्या तुलनेत यंदा मांढळ आणि भिवापूरमध्ये 60 टक्क्यांपर्यंत अधिक उत्पन्न अपेक्षित आहे दुसरीकडे, आंध्र प्रदेशातील गुंटूरमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत उत्पादनात 10 टक्क्यांनी वाढ झालीय. दुष्काळी खानापुरात स्ट्रॉबेरीची शेती, पाहा शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग, Photos मिरची उत्पादकांना ‘अच्छे दिन’ सर्वसाधारणपणे मार्चच्या प्रारंभीपासून उन्हाळ्यात मिरची खरेदी करून त्याचे तिखट तयार करून वर्षभरासाठी साठवणूक करण्यात येते. त्यात घरगुती महिलांसह लहान-मोठे हॉटेल्स, रेस्टॉरंट संचालक तयार तिखट खरेदी करण्याऐवजी मिरची खरेदी करतात. नागपूरमधून सध्या थायलंड, मलेशिया, मेक्सिको येथे माल पाठवला जातो. एका दिवसाला तब्बल 120 टन मालाची निर्यात करण्यात आली आहे. तर राजुरा येथून 40 हजार पोती, सिरोंचा येथून 7 ते 8 हजार पोती, माढळ येथून 5 पोती आंध्रप्रदेश कर्नाटक येथून 10-12 पोती मिरचीची आवक झाली आहे.

    News18लोकमत
    News18लोकमत

    परदेशात मोठ्या प्रमाणावर भारतीय मिरचीला चांगली मागणी असल्याने भाव देखील मिळत आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांच्या मिरचीला अच्छे दिन आले आहे. कर्नाटक राज्यात बेडगी मिरचीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. बेडगी मिरचीचा रंग आणि तिखटपणामुळे या मिरचीला जागतिक बाजारात मोठी मागणी आहे.सध्या बाजारात मिरचीची आवक वाढली आहे त्यामुळे आगामी काळात मिरचीच्या किमतीत घसरण होण्याची शक्यता आहे. ठोक बाजारात मिरचीचे प्रतिकिलो भाव तेजा -  180 ते 200 रुपये रोशनी -  140 ते 170 रुपये डीडी - 180 ते 220 रुपये माही -  160 ते 170 रुपये

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात