Viral Video
मुंबई 15 ऑक्टोबर : सोशल मीडिया हे माहिती देणारं आणि मनोरंजन करणारं प्लॅटफॉर्म आहे. ज्यामुळे तुम्ही एकदा का इथे आलात की, तुमचा वेळ कसा निघून जातो हे तुमचं तुम्हाला कळणार नाही. इथे आपल्याला कधी हसवणारे, तर कधी माहिती देणारे, तर कधी लग्नाचे असे मनोरंजक व्हिडीओ पाहायला मिळतात की हसून हसून तुमचं पोट दुखू लागले. काहीच दिवसांपूर्वी नवरात्र संपली. हा व्हिडीओ त्या दिवसातला आहे. खरंतर हा व्हिडीओ डिलिव्हरी बॉयचा आहे. जो सध्या चर्चेचा विषय छरला आहे. खरंतर हा डिलिव्हरी बॉय सोसायटीमध्ये आल्यावर असं काही करु लागला की, तो आता सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला आहे. हा व्हिडिओ मुंबईच्या आर्केड अर्थ हाऊसिंग सोसायटीचा आहे. येथे झोमॅटो फूड डिलिव्हरी बॉय काहीतरी विचित्र करताना दिसला. हे ही पाहा : कधी पाहिलंय हत्तीला पाणीपूरी खाताना? हा क्यूट व्हिडीओ तुमचा दिवस बनवेल तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता की हा डिलिव्हरी बॉय त्याची डिलिव्हरी देऊन जात असतो. परंतू तेवढ्यात त्याच्या कानावर गाणं ऐकू आलं आणि त्यानंतर तो स्वत:ला गरबा खेणळ्यापासून आणि त्या गाण्यावर ताल धरण्यापासून रोखू शकला नाही. हा व्हिडीओ त्याच सोसोयटीमधून कोणीतरी काढला आणि सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडीओ तसा साधा वाटत असला, तरी यामधील त्या डिलिव्हरी बॉयचा आनंद हा खूप जास्त आहे.
हे लोक परिस्थीतीमुळे सणासुदिच्या काळात देखील काम आणि मेहनत करत असतात, ज्यामुळे त्यांना जीवनाचा आनंद घेण्यासाठी वेळ मिळत नाही. पण यासगळ्यात देखील या डिलिव्हरी बॉयने आपला आनंद साजरा करण्यासाठी वेळ काढला. ज्यामुळेच लोकांना देखील हा व्हिडीओ आवडला आहे. हे ही पाहा : साप मागे लागला म्हणून सैरावैरा पळू लागला तरुण, सत्य समोर आलं तेव्हा… पाहा Video सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हिडीओ शेअर करताच त्याला 2 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत आणि लोकांकडून खूप प्रतिक्रिया मिळत आहेत. या माणसाच्या आनंदाने नेटकऱ्यांची मने जिंकली. समाजाच्या कानाकोपऱ्यातील लोकांना एकत्र आणण्याचे सामर्थ्य सणांमध्ये कसे असते, हे अनेकांनी लिहिले.