JOIN US
मराठी बातम्या / Viral / 'हा' आहे YouTube वर सर्वात जास्त पाहिला गेलेला व्हिडीओ, नाव ऐकून विश्वास बसणार नाही

'हा' आहे YouTube वर सर्वात जास्त पाहिला गेलेला व्हिडीओ, नाव ऐकून विश्वास बसणार नाही

या व्हायरल गाण्याचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले असून अनेक देशांतील तरुणांचे ते आवडतं गाणं झालं आहे.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 4 डिसेंबर : युट्यूब म्हणजे व्हिडीओची दुनिया, येथे तुम्हाला सगळ्या प्रकारे व्हिडीओ उपलब्ध असलेले मिळतील. यावर तुम्हाला असलेला कोणताही प्रश्न विचारा तुम्हाला व्हिडीओच्या स्वरुपात तुमचं उत्तर मिळेल. इथे मनोरंजक तर कधी थरारक, तर कधा माहिती संदर्भात अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. तुम्ही ज्या प्रकारचे व्हिडीओ पाहाता. त्या प्रकारचेच व्हिडीओ तुम्हाला युट्यूब दाखवतो. काही महिलांसाठी तर हा एक चांगला पर्याय म्हणून समोर आला आहे. ज्यामध्ये जेवण बनवण्यापासून ते रांगोळी काढण्यापर्यंत सगळ्या गोष्टी व्हिडीओ स्वरुपात सांगितल्या आणि शिकवल्या जातात. हे ही वाचा : Optical Illusion : गार्डनमधील ‘या’ साध्या फोटोत लपलाय कुत्रा, तुम्ही त्याला शोधून दाखवणार का? त्यामुळेच सर्व प्रकारच्या आणि प्रदेशांच्या आकर्षक व्हिडिओंसाठी यूट्यूब ही लोकांची पहिली पसंती बनली आहे. स्थानिक गायकांपासून आंतरराष्ट्रीय ग्लोबट्रॉटर्सपर्यंतचे व्हिडीओ देखील या व्यासपीठावर सहज मिळू शकतात. एवढंच काय तर येथे तुम्ही सिनेमा देखील पाहू शकता. थोडक्यात काय तर, प्रत्येक परिस्थितीत काहीतरी देण्यासारखे युट्यूबकडे आहे. त्याबदल्यात युट्युबला मोठ्या प्रमाणावर व्ह्यूज मिळतात, जे जाहिरातदारांना आकर्षित करण्याचं माध्यम आहे. तसेच असे अनेक युट्यूबर आहेत, जे यामाध्यमातून पैसे देखील कमवतात. पण तुम्हाला माहितीय का की, युट्यूबवर सर्वाधिक पाहिलेला व्हिडीओ कोणता? आणि तो किती वेळा पाहिला गेला आहे आणि त्याला किती व्ह्यूज मिळाले? चला पाहू यूट्यूबवर सर्वाधिक पाहिलेला व्हिडीओ यूट्यूबवर सर्वात जास्त पाहिलेला व्हिडीओ आणि जगातील सर्वात आवडता व्हिडीओ म्हणजे लहान मुलांचे गाणे, ‘‘बेबी शार्क’’. सहा वर्षांपूर्वी यूट्यूबवर अपलोड करण्यात आलेल्या या गाण्याला आतापर्यंत 11.76 अब्ज व्ह्यूज मिळाले आहेत. हे गाणं म्हणजे जणू काही जगभरातलं लोकांसाठी बालगीत आहे. यूट्यूबवरील व्हिडीओखाली दिलेल्या माहितीनुसार, गाण्याची म्युझिकल अरेंजमेंट पिंकफोंग, किजकास्टल यांनी केली आहे. याला आवाज दिला आहे बॉमी कॅथरीन हान, होप मेरी सेगोइन, अॅनिपेन मॅथ्यू डिगियाकोमो, रॉबर्ट विल्यम गार्डिनर आणि चॅरिटी वैन सेगोइन या गायकांनी. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचा व्हिडीओ जाणून बसणार नाही विश्वास या व्हायरल गाण्याचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले असून अनेक देशांतील तरुणांचे ते आवडतं गाणं झालं आहे.

तर यूट्यूबवर सर्वाधिक पाहिलेला दुसरा व्हिडीओ म्हणजे लुई फोन्से यांचे डॅडी यांकी अभिनीत डेस्पासिटो हे हिट गाणं. हे सुमारे आठ अब्ज वेळा पाहिले गेले आहे. तिसरा सर्वात जास्त पाहिला गेलेला व्हिडीओ पुन्हा एक गाणं आहे. हे एड शीरनचं शेप ऑफ यू गाणं आहे. तो ५.८ अब्ज वेळा पाहिला गेला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या