JOIN US
मराठी बातम्या / Viral / Viral Video : जुगाड तर बघा! लाकडापासून बनवली बाइक, लोक म्हणाले 'पतंजली तंत्रज्ञान'

Viral Video : जुगाड तर बघा! लाकडापासून बनवली बाइक, लोक म्हणाले 'पतंजली तंत्रज्ञान'

कोणत्याही समस्येवर किंवा अडचणीवर मात करण्यासाठी जुगाड कसा करायचा, हे अनेकांचं खास कौशल्यच असतं. काही जण तर जुगाड टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात पारंगत असतात.

जाहिरात

व्हायरल व्हिडीओ

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 2 फेब्रुवारी : कोणत्याही समस्येवर किंवा अडचणीवर मात करण्यासाठी जुगाड कसा करायचा, हे अनेकांचं खास कौशल्यच असतं. काही जण तर जुगाड टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात पारंगत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. तो पाहिल्यानंतर तुम्हीही या जुगाड टेक्नॉलॉजीच्या प्रेमात पडाल. एका मुलानं लाकडाचा वापर करून बाइक तयार केली आहे. त्याचाच हा व्हिडिओ आहे. ‘टीव्ही 9 हिंदी’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. जुगाड टेक्नॉलॉजीद्वारे अशा काही गोष्टी केल्या जाऊ शकतात, की ज्याची कदाचित एखाद्या इंजिनीअरनेही कधी कल्पना केली नसेल. माणसाचा छंद व्यापक आणि त्याच्याकडे असणारी संसाधनं कमी असतील, तेव्हा जुगाड टेक्नॉलॉजी खूप उपयोगी पडते. अशीही अनेक उदाहरणं सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

संबंधित बातम्या

जुगाड करण्याच्या बाबतीत तर भारतीयांना तोड नाही; पण एकंदरीतच या पृथ्वीवर जुगाड करणाऱ्यांची कमतरता नाही. एखादं काम कितीही अवघड असलं, तरी जुगाड टेक्नॉलॉजीचा वापर करून अनेक जण ते सोपं करतात. यामुळेच जुगाडशी संबंधित एखादा व्हिडिओ जेव्हा इंटरनेटवर येतो, तेव्हा तो वेगानं व्हायरल होतो. नुकताच असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये एका व्यक्तीनं तुटलेल्या झाडापासून बाइक बनवल्याचं दिसत आहे. हेही वाचा -  नागिन डान्सला टक्कर द्यायला आला खटिया डान्स, पाहा मजेशीर Video सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ nujmolhussein नावाच्या युझरने इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. गेल्या महिन्यात शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी तो लाइक केला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्यात. एका युझरनं लिहिलं की, ‘ब्रेक आहे ना बाबा….!’ एका युझरने लिहिलं आहे, की, ‘खर्‍या अर्थानं पाहिलं तर ही पतंजलीची बाइक आहे.’ याशिवाय इतरही अनेकांनी यावर कमेंट केली आहे.

व्हिडिओमध्ये नेमकं काय? व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका व्यक्तीने बाइक बनवण्यासाठी झाड तोडलं नाही किंवा कापलं नाही. त्याने फक्त चाकं आणि हँडल अशा प्रकारे त्या झाडाच्या लाकडाला बसवलं, की त्या झाडापासून बाइक तयार झाली. या व्यक्तीनं फार मेहनत न करता झाडापासून बाइक तयार केली. ती बनवण्यासाठी एखाद्या इंजिनीअरला किती पुस्तकं वाचावी लागतील माहीत नाही. सध्या हा व्हिडिओ धुमाकूळ घालत असून युझर्सकडून तो शेअर होण्याचं प्रमाणही जास्त आहे. जुगाड टेक्नॉलॉजीने अनेकांना भुरळ घातली आहे; पण एखादं जुगाड करण्याचं कौशल्य आत्मसात करणंही तेवढं सोपं नाही, हेदेखील तेवढंच महत्त्वाचं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या