JOIN US
मराठी बातम्या / Viral / OMG! खेळता खेळता अचानक हवेत उडाला तरुण आणि...; काय घडलं पाहा VIDEO

OMG! खेळता खेळता अचानक हवेत उडाला तरुण आणि...; काय घडलं पाहा VIDEO

खेळताना तरुणांसोबत असं काही घडलं की असा खेळ ते पुन्हा खेळणार नाहीत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 मार्च : व्यक्ती वयाने कितीही मोठी झाली तरी तिच्यात एक लहान मूल दडलेलं असतं. संधी मिळताच हे लहान मूल बाहेर येतं. दोन तरुणांमध्ये असंच लहान मूल जागरूक झालं. लहान मुलांसारखी मस्ती, खोडकरपणा ते करू लागले. पण त्यानंतर त्यांच्यासोबत जे घडलं ते आयुष्यभर कधीच विसरणार नाहीत. दोन तरुणांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हे दोन्ही तरुण लहान मुलांसारखे खेळत होते. छोट्याशा सी-सॉवर ते बसले होते. दोन बाजूला दोघं बसले होते आणि कॅमेऱ्याकडे पाहत होते. तेव्हा अचानक एक तरुण पटकन उठला तो हवेत उडाला.  पण त्याने सी-सॉवरील हात सोडले नाही. तो तसंच पकडून राहिला. उलटा होत तो आणि समोरच्या तरुणावर जाऊन आपटला. त्यानंतर दोघंही जमिनीवर धाडकन कोसळले. हे वाचा -  तरुणीसमोर हिरोपंती करायला गेला अन् झाली भलतीच फजिती; हा VIDEO पाहून पोट धरून हसा व्हिडीओ पाहूनच आपल्याला धडकी भरते पण हसूही आवरत नाही. दोघं तरुण इतक्या जोरात जमिनीवर आदळले की त्यांना नक्कीच दुखापत झाली असावी. आता हे तरुण यापुढे असं काही करण्याची हिंमत कदाचित कधीच करणार नाहीत.

संबंधित बातम्या

gilberto.amancio1mg नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. कुणी शॉकिंग तर कुणी मजेशीर कमेंट केल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या