JOIN US
मराठी बातम्या / Viral / World television day : टीव्ही संदर्भातील असे गैरसमज, जे आजही लोक खरं मानतात...

World television day : टीव्ही संदर्भातील असे गैरसमज, जे आजही लोक खरं मानतात...

टीव्हीसमोर वेळ घालवल्याने आरोग्यावर परिणाम होतो, परंतु याच्याशी संबंधित असे अनेक समज-गैरसमज लोकांच्या मनात आहेत. जे दूर करणे आवश्यक आहेत.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई २१ नोव्हेंबर : टीव्ही आणि मोबाईल हा लोकांच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. लोक सगळ्याच कामासाठी मोबाईलवर अवलंबून असतात. त्याच आता टीव्ही देखील स्मार्ट आल्यामुळे लोकांनी त्याला देखील मोठ्या प्रमाणात वापरायला सुरुवात केली आहे. तसेच मोबाईल येण्यापूर्वी पासूनच लोक टीव्हीकडे एक करमणूक म्हणून पाहात होते. तसेच लोक कामावर किंवा ऑफिसला देखील लॅपटॉप, कंप्युटरसमोर बसतात. त्यामुळे लोकांना बराचसा वेळ हा स्क्रिन समोरच जातो. विशेषत: मुलं आपला जास्तीत जास्त वेळ टीव्हीसह इतर गॅजेट्समध्ये घालवत आहेत. अशा परिस्थितीत त्याचा त्यांच्या आरोग्यावर आणि डोळांच्या आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होऊ लागतो. हे ही पाहा : प्रवाशांच्या सुरक्षेसाठी असतात रेल्वे रुळाच्या बाजूला हे बॉक्स, तुम्हाला माहितीय का याचा उपयोग? टीव्हीसमोर वेळ घालवल्याने आरोग्यावर परिणाम होतो, परंतु याच्याशी संबंधित असे अनेक समज-गैरसमज लोकांच्या मनात आहेत. जे दूर करणे आवश्यक आहे. तर, आज जागतिक टीव्ही दिनानिमित्त जाणून घेऊया टीव्हीमुळे होणाऱ्या हानीशी संबंधित काही गोष्टी गैरसमज- गाजर खाल्ल्याने त्यांची दृष्टी सुधारते? तथ्य- गाजरातील बीटा-कॅरोटीन आणि व्हिटॅमिन-ए दोन्ही डोळ्यांसाठी खूप फायदेशीर मानले गेले आहेत. पण याचा अर्थ असा अजिबात नाही की जे जास्त टीव्ही पाहतात त्यांच्यासाठी गाजर जास्त फायदेशीर आहे. गाजर खाल्ल्याने डोळ्यांच्या दृष्टीत विशेष बदल होत नाही. गैरसमज - कमी प्रकाशात टीव्ही पाहणे हानिकारक आहे? तथ्य- कमी प्रकाशात टीव्ही पाहणे डोळ्यांसाठी खूप हानिकारक आहे, असे अनेकांचे मत आहे. परंतु तज्ञांच्या मते, कमी प्रकाशामुळे आपल्या डोळ्यांवर फारसा वाईट परिणाम होत नाही. वास्तविक, कमी प्रकाशात टीव्ही पाहिल्यावर आपले डोळे प्रकाशानुसार स्वतःला जुळवून घेतात, त्यामुळे डोळ्यांवर विशेष परिणाम होत नाही. गैरसमज- सतत टीव्ही स्क्रीन पाहण्याने डोळे कमजोर होतात? तथ्य- लोकांचा हा समजही पूर्णपणे चुकीचा आहे. टीव्हीच्या स्क्रीनमुळे डोळे खराब होत नाहीत, पण हो, सतत टीव्हीसमोर बसल्याने डोळ्यांत पाणी येतं, त्यामुळे टीव्ही पाहताना मधेच ब्रेक घेत राहणं गरजेचं आहे.

गैरसमज- टीव्ही पाहताना चष्मा लावलाच पाहिजे? तथ्य- तुम्ही अनेकदा लोकांना असं बोलताना ऐकलं असेल की, ज्यांचे डोळे खराब आहेत किंवा ज्यांना चष्मा लागला आहे, त्यांनी नेहमी चष्मा लावावा. यासोबतच काही लोकांचा असाही विश्वास आहे की तुम्ही चष्मा लावून टीव्ही पाहिल्यास ते तुमचे डोळे खराब करणार नाही. पण यात अजिबात तथ्य नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या