JOIN US
मराठी बातम्या / Viral / नवलच! रात्री झोपताना दोघंच होते मात्र सकाळी पाहिलं तर दोनाचे तीन झाले; बघून घरचेही हैराण

नवलच! रात्री झोपताना दोघंच होते मात्र सकाळी पाहिलं तर दोनाचे तीन झाले; बघून घरचेही हैराण

14 ऑगस्टच्या रात्री आपल्या कुटुंबीयांसोबत जेवण केल्यानंतर जॉर्जिया आणि केविन झोपायला गेले. रात्री अचानक जॉर्जियाच्या पोटात दुखू लागलं. मध्यरात्री तीन वाजता त्यांनी रुग्णवाहिका बोलावली

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 23 ऑगस्ट : दोनाचे तीन होणं ही कोणत्याही जोडप्यासाठी एक अत्यंत आनंदाची गोष्ट असते. प्रत्येक महिलेसाठी गरोदरपणाचे नऊ महिने हे अगदी खास असतात. या नऊ महिन्यांमध्ये महिलेच्या शरीरामध्ये कित्येक बदल होतात. शरीरातील बदल, हॉर्मोनल चेंजेस आणि त्यामुळे होणारे मूड स्विंग्ज याशिवाय इतरही बऱ्याच गोष्टींमुळे हा काळ महिलेसाठी आणि तिच्या कुटुंबीयांसाठीही अविस्मरणीय असतो. पण जर एखाद्या महिलेला हे माहीतच नसेल की ती गरोदर (Woman Unaware of Own Pregnancy) आहे, तर? कल्पना करा, एका महिलेला आणि तिच्या कुटुंबीयांना माहितीच नाही की ती महिला प्रेग्नंट (Unknown Pregnancy For 9 Months) आहे आणि अचानक एक दिवस ती थेट बाळाला जन्म देते. हे खरं वाटत नाही ना? मात्र, ब्रिटनमधील मँचेस्टर शहरातल्या एका महिलेला असाच अनुभव आला आहे. निशब्द! 5 बहिणींनी भावाच्या मृतदेहाला बांधली राखी; अशी राखीपौर्णिमा कधीच नको मँचेस्टरमध्ये राहणाऱ्या जॉर्जिया क्रॉथर (Georgia Crowther) या महिलेसोबत ही घटना घडली आहे. या महिलेला आजिबात कल्पना नव्हती, की ती चक्क नऊ महिन्यांची गरोदर आहे. 14 ऑगस्टच्या रात्री अचाकन तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या, तेव्हा त्यांनी अम्ब्युलन्स बोलावली. ॲम्ब्युलन्स यायला सहा तासांचा वेळ लागला. ती आली तोपर्यंत इकडे जॉर्जियाने बाळाला (Manchester woman secret pregnancy) जन्म दिला होता. बाळाला पाहून जॉर्जिया आणि तिचा पार्टनर दोघेही कमालीचे आश्चर्यचकित झाले होते. मँचेस्टर इव्हिनिंग न्यूजने (Manchester evening news) दिलेल्या माहितीनुसार, 20 वर्षांची जॉर्जिया ही आपल्या 27 वर्षांचा पार्टनर केविनसोबत (Calvin) राहते. 14 ऑगस्टच्या रात्री आपल्या कुटुंबीयांसोबत जेवण केल्यानंतर जॉर्जिया आणि केविन झोपायला गेले. रात्री अचानक जॉर्जियाच्या पोटात दुखू लागलं. मध्यरात्री तीन वाजता त्यांनी रुग्णवाहिका बोलावली, मात्र ती येण्यापूर्वीच जॉर्जियाची डिलिव्हरी झाली होती. तिला किंवा तिच्या कुटुंबीयांना जराही कल्पना नव्हती की ती गरोदर (Secret Pregnancy) आहे. यामुळे सर्वांनाच जन्मलेलं बाळ पाहून आश्चर्याचा धक्का बसला. रात्रभर रांगेत उभं राहूनही नाही मिळाली लस; लसीकरण केंद्राबाहेरच नागरिकांचा राडा जॉर्जिया आणि केविनला आधीपासूनच एक मुलगी आहे. यानंतर जॉर्जिया बर्थ कंट्रोल पिल्स (Birth Control pills) घेत होती. या पिल्समुळे तिची मासिक पाळी येत नव्हती. साधारणतः प्रेग्नंट असल्यानंतर मासिक पाळी (missing periods) चुकते. मात्र, जॉर्जिया पिल्स घेत असल्यामुळे तिला कळलंच नाही, की आपली पाळी प्रेग्नंसीमुळे येत नाहीये. डिलिव्हरी झाल्यानंतर जॉर्जिया आणि तिच्या बाळाला रुग्णालयात नेण्यात आले. या दोघांचीही प्रकृती चांगली असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. दरम्यान, जॉर्जियाचा हा किस्सा रुग्णालयातही चर्चेचा विषय झाला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या