JOIN US
मराठी बातम्या / Viral / जीवापेक्षा सेल्फी हवा! पुरात बुडाली तरी पाण्याबाहेर हात ठेवून शूट करत राहिली VIDEO

जीवापेक्षा सेल्फी हवा! पुरात बुडाली तरी पाण्याबाहेर हात ठेवून शूट करत राहिली VIDEO

पुरात आपला जीव वाचवण्यासाठी महिला सेल्फी घेण्यासाठी धडपड करत राहिली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 जुलै : काही लोकांना सेल्फी घेण्याची इतकी हौस असते की ते कधीही, कुठेही सेल्फी घेताना दिसतात. फिरायला गेल्यावर एखादं सुंदर दृश्य दिसलं तर मग सेल्फी घेण्याचा मोह साहजिकच कुणालाही आवरणार नाही. पण एका महिलेने तर हद्दच केली. तिने तर पुरातही सेल्फी घेणं सोडलं नाही. पुराच्या पाण्यात ती स्वतः पूर्णपणे बुडाली पण तरी ती पाण्यातून हात बाहेर काढून आपला व्हिडीओ शूट करत राहिली. हा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Woman Taking Selfie in Flood). अनेक ठिकाणी पावसाने रौद्र रूप धारण केलं आहे. पुराने हाहाकार माजवला आहे. अशा परिस्थिती लोक आपला जीव वाचवण्यासाठी धडपड करतात पण एक महिला मात्र या परिस्थितीतून आपला जीव वाचवण्याऐवजी सेल्फी घेण्यासाठी धडपड करताना दिसली. जीवापेक्षा तिला सेल्फी महत्त्वाचा वाटला. हे वाचा -  …अन् संतप्त महिला रिपोर्टरने लाइव्हमध्येच मुलाच्या थोबाडीत मारली; नेमकं काय घडलं पाहा VIDEO व्हिडीओत तुम्ही पाहू शकता महिला हातात सेल्फी स्टिक घेऊन आपला व्हिडीओ शूट करते आहे. ती पळताना दिसते. तिच्या मागून आणखी काही लोक पळत आहेत. महिला पुढे येऊन उभी राहते आणि मागून समुद्राच्या लाटेसारखं पाणी येताना दिसतं. हे पुराचं पाणी आहे. महिला त्या पुरात पूर्णपणे बुडते. पण ती आपला हात पाण्याच्या आत जाऊ देत नाही. ज्या हाताता सेल्फी स्टिक आहे तो एक हात ती पाण्याबाहेरच ठेवते आणि व्हिडीओ शूट करत राहते.

संबंधित बातम्या

तिला पुरात आपला जीव जाईल या भीतीपेक्षा सोशल मीडियावर आपल्या व्हिडीओकडे जास्तीत जास्त लोकांचं लक्ष वेधून घेण्याचीच घाई आहे. हे वाचा -  VIDEO : ज्या दोरीने बांधलं त्याच दोरीने फरफटत नेलं; गाईने खाटिकाला दिली भयंकर शिक्षा Figen  ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ इंडोनेशियातील असल्याचं सांगितलं जातं आहे. यावर बऱ्याच कमेंंट येत आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटलं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो सर्वात महत्त्वाचं असं धाडस तुम्ही मात्र करू नका.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या