नवी दिल्ली 13 जून : 26 वर्षीय तरुणीचा प्रियकर अनेक दिवसांपासून बेपत्ता होता. बराच काळ प्रियकर न सापडल्याने तिला काळजी वाटू लागली आणि तिने प्रियकराचा शोध घेण्यासाठी फेसबुकची मदत घेतली. पण त्याचदरम्यान असं वास्तव समोर आलं, ज्याने तरुणीला धक्काच बसला. द सनच्या रिपोर्टनुसार, या मुलीचं नाव राचेल वॉटर्स आहे. राचेलचा जन्म अमेरिकेत झाला असला तरी ती सध्या चीनमध्ये राहते. रोमँटिक प्रपोजचा अनपेक्षित शेवट; कॅमेऱ्यात कैद झाला तो विचित्र क्षण, पाहा VIDEO अलीकडेच तिने तिच्या फेसबुक पोस्टमध्ये सांगितलं की, तिचा प्रियकर पॉल मॅगी ब्रिटनला ट्रिपला गेला होता. पण बरेच दिवस झाले तरी ना तो परत आला ना त्याने काही निरोप दिला. यानंतर राचेलने 40 वर्षीय पॉलच्या शोधात फेसबुकच्या माध्यमातून त्याच्या मित्रांशी संपर्क साधला. त्याचदरम्यान, राचेलला समजलं की पॉल विवाहित आहे आणि त्याला मुलं आहेत. तो आपल्या कुटुंबासह ब्रिटनमध्ये राहतो. हे कळताच तिच्या पायाखालची जमीनच सरकली (Cheating in Love). राचेलला विश्वासच बसत नव्हता की ज्या व्यक्तीसाठी ती इतकी काळजी करत होती ती व्यक्ती तिची फसवणूक करत आहे. वास्तव समजल्यानंतर तिने फेसबुकवरून तिची पोस्ट हटवली, ज्यामध्ये तिने पॉलचा शोध घेण्यासाठी लोकांना त्याच्याबद्दल माहिती विचारली होती. राचेल एक प्रोफेशनल व्हॉलीबॉल खेळाडू आहे. VIDEO: वेट्रेसने रेस्टॉरंटमध्येच केली ग्राहकांची जबर धुलाई; नेमकं काय घडलं पाहा झालं असं की जेव्हा कोरोनाचा काळ होता, तेव्हा लॉकडाऊनमुळे पॉल चीनच्या Shenzhen मध्ये अडकला होता आणि याच दरम्यान त्याची राचेलशी भेट झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. पण लॉकडाऊन संपताच पॉल त्याच्या देशात ब्रिटनला गेला आणि परत आलाच नाही. मात्र आता राचेलला पॉलचं सत्य समजलं आहे आणि तीदेखील या गोष्टीतून बाहेर पडून आपल्या आयुष्यात पुढे गेली आहे.