JOIN US
मराठी बातम्या / Viral / 4 मुलांच्या आईचं जडलं 22 वर्षीय तरुणावर प्रेम; लग्नाच्या मागणीसाठी 72 तासांपासून प्रियकराच्या दारात बसून

4 मुलांच्या आईचं जडलं 22 वर्षीय तरुणावर प्रेम; लग्नाच्या मागणीसाठी 72 तासांपासून प्रियकराच्या दारात बसून

प्रेयसी आपल्या दीड वर्षाच्या बाळाला घेऊन प्रियकराच्या (Lover) घराच्या दरवाजात मागील 72 ताासांपासून बसून राहिली आहे. लग्नासाठी (Marriage)ती आपल्या प्रियकराची वाट पाहात आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लखनऊ 08 मे : प्रेमात फसवणूक (Cheating in Love) झाल्याच्या कित्येक घटना समोर येत असतात. मात्र, आता समोर आलेली एक घटना वाचून तुम्हीही थक्क व्हाल. या घटेनमध्ये एक प्रेयसी आपल्या दीड वर्षाच्या बाळाला घेऊन प्रियकराच्या (Lover) घराच्या दरवाजात मागील 72 ताासांपासून बसून राहिली आहे. लग्नासाठी (Marriage) ती आपल्या प्रियकराची वाट पाहात आहे. मात्र, ऐनवेळी प्रियकर आणि त्याचे कुटुंबीय घराच्या दरवाजाला कुलूप लावून फरार झाले आहेत. ही घटना उत्तर प्रदेशच्या जौनपूर जिल्ह्यातील महराजगंज येथील आहे. शुक्रवारी बदलापूरच्या सीओंनी तिला समजावण्याची खूप प्रयत्न केला मात्र ती आपल्या मागणीवर ठाम राहिली. मौलाना मोलबी समसुल वारिश यांच्या 22 वर्षीय कमरुल वारिश या मुलाचे आपल्याच परिसरातील 37 वर्षीय चार मुलांच्या आईसोबत संबंध होते. तो प्रेयसीच्या घरी जात तिच्या मुलांना शिकवत असे. कामानिमित्त तो मुंबईमध्ये राहात होता. मात्र, लॉकडाऊनच्या काळात घरी परत येऊन मजुरी करत होता. एका महिन्यापूर्वी महिला कोलकातामध्ये आपल्या माहेरी गेली, यानंतर त्यांच्या दोघांमध्ये संबंध होते. प्रियकराच्या म्हणण्यानुसार ती 28 एप्रिलला वाराणसीमध्ये आली. त्याच्या बहिणीच्या घरी हे दोघंही तीन दिवस राहिले. महिलेनं दिलेल्या माहितीनुसार, हे दोघंही एकमेकांना लपून भेटत असतं. यानंतर हे जोडपं महराजगंजमध्ये पोहोचलं आणि आपल्या वडिलांच्या जुन्या घरामध्ये ते राहिले. महिलेच्या म्हणण्यानुसार, मुलाचे वडिलही म्हणाले, की तू तुझ्या नवऱ्याकडून तलाक घेऊन ये. यानंतर तुझा निकाह माझ्या मुलासोबत करुन देईल. प्रियकरही हेच सांगून गेला की तलाक घेऊन ये मग आपण लग्न करू. तिनं सांगितलं, की भाऊ आणि वडिलांना त्याला धमकी देऊन पळवून लावलं आहे. मात्र, त्यानं मला सांगितलं आहे, की मी माघारी येत नाही, तोपर्यंत माझ्या घरीच थांब. महिलेनं सांगितलं, की तो जोपर्यंत माघारी येत नाही तोपर्यंत मी इथेच बसून राहाणार आहे. त्याच्यासोबत मी मागील तीन वर्षांपासून नात्यात असून हा दीड वर्षाचा मुलगाही त्याचाच आहे. तिनं सांगितलं, की मागच्या 72 तासांपासून मी काहीही न खाता त्याच्या दरवाजाता बसले आहे. महिलेनं सांगितलं, की जोपर्यंत तिचा प्रियकर माघारी येत नाही, तोपर्यंत ती काहीही खाणार नाही. शेजाऱ्यांनी तिच्या दीड वर्षाच्या मुलासाठी दुधाची व्यवस्था केली आहे. याबाबतीत बोलताना एसओ ओम नारायण सिंह यांनी सांगितलं, की या महिलेला खूप समजावलं मात्र ती काहीही ऐकायला तयार नाही. तिच्या भोजनाची व्यवस्था करण्यास एका शेजारच्या व्यक्तीला सांगितलं आहे, गरज पडल्यास तिच्या राहाण्याचीही तिथेच व्यवस्था केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या