JOIN US
मराठी बातम्या / Viral / 30 वर्षांपासून एकदाही खाली बसू शकलेली नाही महिला; सांगितली स्वतःची वेदनादायी कहाणी

30 वर्षांपासून एकदाही खाली बसू शकलेली नाही महिला; सांगितली स्वतःची वेदनादायी कहाणी

तिला असा आजार आहे (Weird Rare Disease), ज्यामुळे ती 30 वर्षांपासून बसू शकली नाही. तिच्या आईने सांगितलं की ती एकदा वयाच्या दुसऱ्या वर्षी बसली होती. त्यानंतर ती कधीच बसलेली नाही.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 16 मे : प्रत्येक माणसाला एवढं तर नक्की वाटत असतं, की त्याला स्वत:च्या बळावर चालता यावं, उठून बसता यावं आणि आपली दैनंदिन काम करता यावी. म्हणजेच, असं जीवन जे जवळजवळ प्रत्येक मनुष्य जगत आहे. कारण हाच जीवनाचा आधार आहे. मात्र एका महिलेसाठी आपल्याला अगदी सामान्य वाटणारं हे आयुष्य सुद्धा एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नाही. पोलंडच्या 32 वर्षीय जोआना क्लिचला जर कोणी विचारलं की तिला आयुष्यात काय हवं आहे, तर तिचं उत्तर कदाचित असं असेल की तिला चालायचं आहे, बसायचं आहे आणि तिच्या नेहमीच्या कामांसाठी तिला इतर कोणाचा सहारा घ्यायची गरज लागू नये. कारण तिला असा आजार आहे (Weird Rare Disease), ज्यामुळे ती 30 वर्षांपासून बसू शकली नाही. तिच्या आईने सांगितलं की ती एकदा वयाच्या दुसऱ्या वर्षी बसली होती. त्यानंतर ती कधीच बसलेली नाही. या तरुणीचा फोटो पाहून वयाचा अंदाजही लावू शकत नाही; विचित्र आजारामुळे झालीये ही अवस्था क्लिचला जन्मापासून असा एक दुर्मिळ आजार आहे ज्यामुळे ती बसू शकत नाही. तिचा पाठीचा कणा स्वतःचं वजन हाताळू शकत नाही. स्पाइनल मस्क्युलर ऍट्रोफीमुळे तिला आता नित्यक्रमासाठीही इतरांवर अवलंबून राहावं लागतं. तिला उपचारासाठी निधी गोळा करायचा आहे. तिच्या आजारपणानंतरही क्लिच वयाच्या 21 व्या वर्षापर्यंत स्वतःच स्वतःची खूप काळजी घेत असे. ती दुसऱ्या देशात काम करायची, पण आता तिचं शरीर इतकं असहाय्य झालं आहे की आता तिला प्रत्येक कामासाठी आधाराची गरज भासू लागली आहे. यामुळेच ती चिंतेत आहे, कारण तिची शारीरिक स्थिती दिवसेंदिवस बिघडत आहे.

क्लिचला काळजी वाटते की तिची प्रकृती नंतर आणखी वाईट होईल, परंतु ती सामान्य जीवन जगण्याचं स्वप्न पाहते. तिला स्वतःच्या बळावर खूप काही करायचं आहे. म्हणूनच ती GoFundMe खात्याद्वारे तिच्या उपचारासाठी निधी गोळा करत आहे. क्लिच म्हणते की फिजिओथेरपी तिला मजबूत करेल, जर स्नायू मजबूत असतील तर उभं राहणं इतकं अवघड नाही. तिला काही शस्त्रक्रियाही कराव्या लागणार आहेत, मात्र यामुळे तिच्या जीवाला धोका आहे. पैसे नसल्याने बेघर झालेला तरुण; अचानक जुन्या बँक अकाऊंटबद्दल समजलं अन् आयुष्यच बदललं सध्या क्लिचला व्हर्टिकल व्हीलचेअरचा वापर करावा लागतो. आपल्या मदतीसाठी तिला वेदनाशामक औषधे आणि श्वसन यंत्र वापरावं लागतं. मात्र आता या सर्व सुविधांनंतरही तिचं आयुष्य कठीण होऊ लागलं आहे. तिचं वजन थोडंही वाढलं, तर तिला या मशिनवर चालणं कठीण होतं. वाढलेले वजन तिच्या पायाला सहन होत नाही. मात्र तिला चालत राहाण्याची इच्छा आहे. कारण ती आयुष्यभर बेडवर राहू शकत नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या