मुंबई, 15 ऑक्टोबर : काही जणांचं प्राण्यांवर इतकं प्रेम असतं की ते प्राणी म्हणजे त्यांचा जीवच असतो (Human animal love video). अगदी आपल्या पोटच्या मुलांप्रमाणे ते प्राण्यांना जपतात. कुत्रा, मांजर यांचे असे बरेच व्हिडीओ (Animal love video) तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. ज्यात त्यांचे मालक त्यांच्यासोबत मस्ती करताना, त्यांना प्रेमाने गोंजारताना, अगदी त्यांची किस घेतानाही दिसतात. पण एका महिलेने थेट चित्त्यालाच (Woman kissing cheeta) किस देण्याचा प्रयत्न केला आहे (cheeta video). चित्ता म्हटलं तरी आपल्या अंगाला घाम फुटतो. अगदी नॅशनल पार्क, जंगल सफारी, प्राणीसंग्रहालयात गेल्यावर दुरून चित्ता पाहिला तरी आपला थरकाप उडतो. चित्ता अगदी जवळ आला तर मग आपला जीव गेल्यातच जमा. पण ही महिला मात्र अगदी जणू कुत्रा-मांजरच असावा असं चित्त्याला गोंजारताना, त्याला मिठी मारताना दिसली. इतकंच नव्हे तर चित्त्याला तिने किसही केलं. पुढे या महिलेसोबत काय घडलं पाहा.
नेचर नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टमध्ये तीन व्हिडीओ देण्यात आले आहेत. ज्यात ही महिला चित्त्यांसोबत दिसते आहे. हे वाचा - OMG! हत्तीसोबत Seesaw वर उभा राहिला तरुण; पुढे काय घडलं ते तुम्हीच पाहा VIDEO व्हिडीओत पाहू शकता महिला एका पार्कात आहे. तिच्या आजूबाजूला बरेच चित्ते आहेत. पहिल्या व्हिडीओत तिला चित्त्याला घट्ट धरल्याचं दिसतं आहे. ही महिला त्याच्या पाठीवरून हात फिरवते आहे आणि चित्ता शांत आहे. दुसऱ्या व्हिडीओत ही महिला चित्त्याच्या मानेवरून हात फिरवते आहे. जणू ती त्याला मसाज देते आहे आणि चित्ता डोळे बंद करून शांत बसून मसाजचा आनंद लुटतो आहे. हे वाचा - भक्तिरसात दंग झालं माकड, हातात करताल घेऊन करू लागलं भजन; पाहा VIDEO तिसरा व्हिडीओ पाहून तर तुम्हाला धडकीच भरेल. तिसऱ्या व्हिडीओत ही महिला चक्क चित्त्याला किस करते. यानंतर चित्ता तिच्याकडे आपलं तोंड करतो आणि तिच्या गालाला जिभेने चाटतो. तो आपल्या पद्धतीने प्रेम व्यक्त करतो.