JOIN US
मराठी बातम्या / Viral / युवकाच्या घरात राहाणारी ही महिला नेमकी कोण होती? कॅमेऱ्यात कैद झालेला VIDEO पाहून उडेल थरकाप

युवकाच्या घरात राहाणारी ही महिला नेमकी कोण होती? कॅमेऱ्यात कैद झालेला VIDEO पाहून उडेल थरकाप

युवकानं आपल्या घरातील काही वस्तू गायब होत असल्याचं लक्षात आल्यानं घरात एक कॅमेरा बसवला. यानंतर त्याला दिसलं, की एक महिला लपून त्याच्या घरातील कपाटामध्ये (Woman Had been Secretly Living in Cupboard) राहात आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

न्यूयॉर्क 31 मे : आपल्याच घरात आपल्या नकळत एखादी अनोळखी व्यक्ती राहात आहे आणि ही गोष्ट आपल्याला बऱ्याच दिवसांनी समजली तर? नक्कीच हे पाहून आपल्याला धक्का बसेल. मात्र, एका युवकानं हा अनुभव घेतला आहे. न्यूयॉर्कमधील Joe Cummings नावाच्या युवकासोबत अशीच एक घटना 2009 मध्ये घडली. हा दावा खरा असल्याचं सिद्ध करण्यासाठी त्यानं आपल्या घरातील कॅमेऱ्यात कैद (Security Camera) झालेला व्हिडिओदेखील शेअर केला. या युवकानं आपल्या घरातील काही वस्तू गायब होत असल्याचं लक्षात आल्यानं घरात एक कॅमेरा बसवला. काही दिवसांनंतर त्यानं या कॅमेऱ्यात कैद झालेलं फूटेज चेक केलं तेव्हा त्याला धक्काच बसला. त्याला दिसलं, की एक महिला लपून त्याच्या घरातील कपाटामध्ये (Woman Had been Secretly Living in Cupboard) राहात आहे. ती त्याच्या घरातील खाण्याचे पदार्थ चोरत असे. हा व्हिडिओ 2009 मध्ये शेअर करण्यात आला होता. मात्र, आता जवळपास तेरा वर्षांनी हा व्हिडिओ पुन्हा चर्चेत आला असून नेटकरीही हा व्हिडिओ पाहून हैराण झाले आहेत. या व्हिडिओमध्ये दिसतं, की युवक रुममधून बाहेर जाताच ही महिला कपाटातून बाहेर येते. ती एका टेबलखालून स्टूल बाहेर काढते आणि याच्या मदतीनं अगदी काळजीपूर्वक आणि आवाज न करता ती खाली फरशीवर उतरते.

काही वेळानंतर ही महिला युवकाच्या घरातील फ्रिज उघडते आणि यातून काही स्नॅक्स आणि ड्रिंक्स घेते. यानंतर ती टीव्ही सुरू करते आणि काही वेळ टीव्ही पाहात बसते. यानंतर ती पुन्हा खाण्यासाठी काही पदार्थ घेण्याच्या उद्देशानं फ्रिजकडे जाते. मात्र, इतक्यात तिला घराच्या मालकाचा येण्याचा आवाज ऐकू येतो. समोर आलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर संबंधीत तरुणानं याबाबत पोलिसांकडे तक्रार केली आणि पोलिसांनी या महिलेला अटक केली. ही महिला दोन आठवडे लपून या तरुणात्या घरात राहिली असल्याचंही समोर आलं आहे. संबंधित युवकानं याबाबत बोलताना म्हटलं, की ही महिला घरामध्ये कधी आली, याबाबत मला काहीही कल्पना नाही. ही महिला खिडकीच्या मार्गे घरात आली असावी, असा अंदाज त्यानं व्यक्त केला. त्यानं म्हटलं, की पोलिसांच्या अंदाजानुसार, ही महिला चोरीच्या उद्देशानं घरात शिरली असावी मात्र नंतर तिनं इथेच मुक्काम ठोकला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या