JOIN US
मराठी बातम्या / Viral / प्रसूतीदरम्यान पतीचं ते वाक्य ऐकून भडकली महिला; डिलिव्हरी रूममधून केली हकालपट्टी, पण झाला वेगळाच परिणाम

प्रसूतीदरम्यान पतीचं ते वाक्य ऐकून भडकली महिला; डिलिव्हरी रूममधून केली हकालपट्टी, पण झाला वेगळाच परिणाम

तिच्या Reddit पोस्टमध्ये महिलेनं सांगितलं की सुरुवातीला तिला असह्य वेदना सहन होत असताना तिचा नवरा तिला आधार देण्यासाठी तिथे होता. मात्र यादरम्यान त्याने असं काही म्हटलं की गरोदर महिला भडकली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 03 जून : स्त्रीसाठी बाळाला जन्म देण्याचा काळ केवळ शारीरिकच नव्हे तर भावनिकदृष्ट्याही अत्यंत संवेदनशील असू शकतो. त्या प्रसंगी शक्य तितका सपोर्ट करणं खूप महत्वाचं असतं. मात्र एका विचित्र घटनेत एका पतीने डिलिव्हरी रूममध्ये (Delivery Room) आपल्या 32 वर्षीय पत्नीला असं काही म्हटलं की प्रसूतीदरम्यानच तिने त्याला बाहेर का़ढलं. तिच्या Reddit पोस्टमध्ये महिलेनं सांगितलं की सुरुवातीला तिला असह्य वेदना सहन होत असताना तिचा नवरा तिला आधार देण्यासाठी तिथे होता. मात्र यादरम्यान त्याने असं काही म्हटलं की गरोदर महिला भडकली. सासरी जाणाऱ्या लेकीवर थुंकतो बाप; इथं लग्नानंतर विचित्र पद्धतीने होते मुलीची पाठवणी महिलेनं रेडिटवर प्रसूतीदरम्यान घडलेल्या घटनेबद्दल तपशीलवार माहिती दिली. महिलेनं सांगितलं की प्रसूतीदरम्यान दोघांमध्ये कसं संभाषण होत होतं आणि डॉक्टर बाळाबद्दल काय प्रश्न विचारत होते. गर्भवती महिलेच्या वेदना कमी करण्यासाठी डॉक्टर तिला हे प्रश्न विचारत होते. प्रसूतीदरम्यान डॉक्टरांनी तिला विचारलं की तू बाळाबद्दल उत्साहित आहेस का? यावर महिलेनं म्हटलं की, ‘गर्भधारणेचा हा काळ माझ्यासाठी खूप कठीण गेला. यादरम्यान तिच्या पतीने हे ऐकलं आणि म्हणाला की माझ्यासाठीही हे खूप कठीण होतं’. यादरम्यान डॉक्टरांना जाणवलं की दोघांमध्ये वाद सुरू होणार आहे. यामुळे त्यांनी दुसरीकडे दोघांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला मात्र याचा काहीही फायदा झाला नाही. पतीने डिलिव्हरी रूममध्ये म्हटलं की तो आनंदी आहे की हा कठीण काळ संपला. आता तो आपल्या पत्नीला पुन्हा घरी घेऊन जाईल आणि हार्मोनल गडबडही संपलेली असेल. हे ऐकून पत्नीला धक्का बसला आणि तिला रागही आला. ब्रेकअपनंतर तरुणाचं धक्कादायक कृत्य; एक्स गर्लफ्रेंडचं अपहरण करत केलं विचित्र काम पोस्टमध्ये महिलेनं लिहिलं, की ती खूप अस्वस्थ झाली आणि तिने पतीला रूममध्ये बाहेर जाण्यास सांगितलं. त्याने म्हटलं की तो कुठेही जाणार नाही कारण त्याचं बाळ जन्म घेत आहे. महिलेनं पुढे सांगितलं की मी त्याला तिथून बाहेर जा असं ओरडून सांगितलं आणि तो नाराज झाला. यानंतर भांडणाचं वादळ गेलं. मात्र, पुन्हा तो आमच्या मुलीला पाहण्यासाठी परत आलाच नाही. मात्र नंतर तो तिला पाहाण्यासाठी आला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या