JOIN US
मराठी बातम्या / Viral / बापरे! हे काय आहे? Street food मध्ये महिलेला सापडलं असं काही की VIDEO पाहूनच थरकाप उडेल

बापरे! हे काय आहे? Street food मध्ये महिलेला सापडलं असं काही की VIDEO पाहूनच थरकाप उडेल

आपण विचारही केला नसेल अशी गोष्ट या महिलेला खाद्यपदार्थात सापडली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

आक्रा, 08 डिसेंबर : खाद्यपदार्थांमध्ये काहीतरी विचित्र सापडल्याची काही प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. असंच आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. एका महिलेला खाद्यपदार्थांमध्ये असं काही सापडलं आहे, ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. महिलेला पाहून धक्का बसलाच पण तिने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर नेटिझन्सही ते पाहून शॉक झाले आहेत. आफ्रिकेच्या घाना देशातील ही घटना आहे. एका महिलेने तुओ जाफी (Tuo Zaafi) खरेदी केलं होतं. ज्यामध्ये तिला काहीतरी विचित्र दिसलं. तुओ जाफी डिश घानातील मुख्य पदार्थ आहे. स्ट्रीट फूड म्हणून अगदी रस्त्यावरील बहुतेक स्टॉलवर हा सहजपणे मिळतो. महिलेने अशाच एका स्टॉलवरून हा पदार्थ खरेदी केला होता.

संबंधित बातम्या

जसं तिने खाण्यासाठी पाकीट उघडलं तसा तिला धक्काच बसला. त्यात तिला पेनिससारखं काहीतरी दिसलं (Human Penis in Food).  तिने याचा व्हिडीओ काढून तो सोशल मीडियावर शेअरही केला. @officialghbase इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. स्ट्रीट फूड खाण्यापूर्वी ते नीट तपासा असा सल्लाही तिने दिला आहे. व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. महिलेला अनेकांनी पोलिसात तक्रार  करायला सांगितलं आहे. हे वाचा -  टेस्टी म्हणून कपलने रेस्टॉरंटमध्ये खा खा खाल्लं; पदार्थाचं सत्य कळताच बसला धक्का माहितीनुसार घानामध्ये पेनिससारखा मांसाचा तुकडा मिळणं ही पहिल्यांदाच घडलेलं नाही. याआधी अकरामध्ये 2016  अकौसा नावाच्या महिलेलाही असंच काहीसं साप़डलं होतं. तिने पोलिसांना याबाबत सांगितलं आणि त्या मांसाची डीएनए टेस्ट करण्याची मागणीही केली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या