नवी दिल्ली 05 फेब्रुवारी : दुर्घटना कधीही घडू शकतात. एखाद्या गोष्टीकडे थोडं दुर्लक्ष झालं तरी भयंकर अपघात घडतात. याचे व्हिडिओही सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होत असतात. यातील काही घटना तर थरकाप उडवणाऱ्या असतात. सध्या सोशल मीडियावर एक असाच व्हिडिओ व्हायरल (Horrific Video) झाला आहे. हा व्हिडिओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. व्हिडिओमध्ये एक महिला शार्कला खाण्साठी मांस टाकत असते. मात्र इतक्यात तिचा तोल जातो आणि ती स्वतःच या पाण्याच्या टँकमध्ये कोसळते (Woman Fell in Shark Tank).
व्हिडिओ चीनमधील जहेजिआंग प्रांतातील एका मॉलमधील आहे. याच्या ओपनिंगच्या बरोबर आधी ही घटना घडली. महिला मॉलच्या स्टाफमधील एक होती, जी टँकमध्ये बंद शार्कला खाण्यासाठी देत होती. मात्र तेव्हाच तिला बॅलन्स बिघडला आणि ती पाण्यात कोसळली. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार सुदैवाने या घटनेत महिलेला काहीही झालं नाही. तिला साधं खरचटलंही नाही. तिला सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे.
मॉलच्याच सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद केली गेली. महिला आधी टाकीच्या किनाऱ्यावर असलेल्या ब्रिजवर चढून त्याचं लिड खोलताना दिसली. नंतर ती शार्कला खाण्यासाठी मांस टाकीत टाकू लागली. मात्र, इतक्यात की शार्कच्या टँकमध्ये कोसळली. टाकीत महिला दोन घातक शार्कसोबत पोहताना दिसली. यादरम्यान तिथे गर्दी जमली आणि लोक तिला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करू लागले.
या प्रकरणाबाबत मॉल अथॉरिटीने स्पष्टीकरण देत म्हटलं, की महिलेनं ज्या ब्रिजवरुन टाकीत मांस टाकलं, तो शॉर्टकट आहे आणि त्याचा वापर करण्यास स्प्ष्टपणे नकार देण्यात आला आहे. मात्र महिलेला एका मीटिंगमध्ये जायचं असल्याने तिने हा मार्ग अवलंबला. महिलेला लगेचच बाहेर काढण्यात आलं. तिला कसलीही दुखापत झाली नसून ती सुखरूप आहे.