JOIN US
मराठी बातम्या / Viral / 'माझ्यावर प्रेम कर, नाहीतर नोकरी सोड'; महिलेनं बॉडीगार्डसमोर ठेवली विचित्र अट अन्...

'माझ्यावर प्रेम कर, नाहीतर नोकरी सोड'; महिलेनं बॉडीगार्डसमोर ठेवली विचित्र अट अन्...

एका महिलेने आपल्या एक्स पार्टनरच्या हिंसक वर्तनापासून वाचण्यासाठी स्वतःकरता बॉडीगार्ड नेमला. काही दिवसांनी महिला त्याच बॉडीगार्डच्या प्रेमात पडली

जाहिरात

प्रातिनिधीक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 12 फेब्रुवारी : एका महिलेने आपल्या एक्स पार्टनरच्या हिंसक वर्तनापासून वाचण्यासाठी स्वतःकरता बॉडीगार्ड नेमला. काही दिवसांनी महिला त्याच बॉडीगार्डच्या प्रेमात पडली (Woman Fell in Love With Bodyguard). महिलेने आता त्याच्याशी लग्न केलं आहे आणि ती सुखी जीवन जगत आहे. आपल्या एक्स पार्टनरचं गैरवर्तन आणि बॉडीगार्डच्या प्रेमात पडण्यापर्यंतची कहाणी नुकतीच स्वतः सांगितली आहे. एलिस स्टीव्हन्स असं या 35 वर्षीय महिलेचं नाव आहे. ‘द सन’च्या रिपोर्टनुसार, 2008 मध्ये स्टीव्हन्सला तिच्या जोडीदाराकडून इतका त्रास झाला की तिने आपल्या मुलीसह त्याच्यापासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. मात्र जोडीदाराचं हिंसक वर्तन पाहून काही जवळच्या लोकांनी तिला बॉडीगार्ड ठेवण्याचा सल्ला दिला.

फ्लाइटमध्ये मिळाली अशी ऑफर की त्याने बायकोलाही सोडलं; तिला एकटं ठेवून पळाला नवरा

एलिस स्टीव्हन्सने तिच्या आणि 13 वर्षांची मुलगी ग्रेसीच्या सुरक्षेसाठी एक खाजगी बॉडीगार्ड ठेवला. ३५ वर्षीय बॉडीगार्ड डेरेक स्टीव्हन्सचा बालपणीचा मित्र होता. डेरेक स्टीव्हन्स आणि तिची मुलगी ग्रेसी यांच्यासोबत त्यांच्या घरात राहत होता. सुरक्षा शुल्क म्हणून डेरेकला प्रति रात्र £75 (7 हजारांपेक्षा जास्त) मिळत असे. दरम्यान, जोडीदारासोबत ब्रेकअप झाल्यानंतर मुलीसोबत एकटीच राहणारी स्टीव्हन्स तिचा बॉडीगार्ड डेरेकच्या प्रेमात पडली. डेरेकलाही स्टीव्हन्स आवडत होती. मात्र एके दिवशी जेव्हा स्टीव्हन्सने डेरेकला प्रपोज केलं तेव्हा त्यानं नकार दिला. स्टीव्हन्सने डेरेकला सांगितलं- ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मला रिलेशनशिपमध्ये राहायचं आहे.’ डेरेकने नकार दिल्यावर स्टीव्हन्सने त्याला नोकरी सोडण्यास सांगितलं.

VIDEO : वाचवा…वाचवा…; पालीला पाहताच तरुणीने अख्खं रेस्टॉरंट हलवून टाकलं

काही दिवसांनंतप डेरेकने हे प्रपोजल स्विकारलं आणि दोघांच्या नात्याला सुरुवात झाली. मार्च 2009 मध्ये त्यांनी लग्नही केलं. लग्नानंतर त्यांना दोन मुलं झाली. आपल्या नात्याबद्दल बोलताना स्टीव्हन्सने सांगितलं की मला खूप अभिमान वाटतो की कोणीतरी माझी मदत केली. मी डेरेकला बॉडीगार्ड म्हणून कामावर ठेवलं. मात्र त्याला बघताच मी त्याच्या प्रेमात पडले. त्याच्याजवळ मला सुरक्षित वाटू लागलं. तर डेरेकचं म्हणणं आहे की हे पहिल्या नजरेत झालेलं प्रेम आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या