JOIN US
मराठी बातम्या / Viral / बापरे! एका पक्षासाठी एवढा त्याग? या कारणामुळे तरुणीनं 2 वर्षांपासून बाहेर फिरणंही सोडलं

बापरे! एका पक्षासाठी एवढा त्याग? या कारणामुळे तरुणीनं 2 वर्षांपासून बाहेर फिरणंही सोडलं

अमेरिकेतील (America) कॅलिफोर्नियात (California) राज्यात राहणाऱ्या जेनेलनंही एक पक्षी पाळला आहे. मात्र, तेव्हापासून ती घरातून बाहेर पडणंच टाळू लागली

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 08 ऑक्टोबर : कोणत्याही मालकासाठी आपला पाळीव पक्षी किंवा प्राणी (Pet Owner Relationship) अतिशय खास असतो. प्रत्येक वेळी आपल्या पेटला आपल्यासोबत ठेवण्याचा प्रयत्न हे लोक करतात. मात्र, जर त्यांना सोबत घेऊन जाणं शक्य नसेल तर हे लोकच बाहेर जाणं टाळतात. अमेरिकेतील (America) कॅलिफोर्नियात (California) राज्यात राहणाऱ्या जेनेलनंही एक पक्षी पाळला आहे. मात्र, तेव्हापासून ती घरातून बाहेर पडणंच टाळू लागली. तिला प्रत्येक वेळी आपल्या पाळीव टूकनची चिंता सतावते. मुलाला दूध पाजताच मरून जाते ही आई, मृत्यू दिसत असतानाही बाळाला ठेवत नाही उपाशी जेनेलचं असं म्हणणं आहे, की पाळीव टूकन टॉकी (American Bird Toucan) तिच्यासाठी तिच्या मुलाप्रमाणे आहे. त्याला ती फक्त 1-2 तासासाठी एकटं सोडू शकते. मात्र, तो माझ्यावर अवलंबून असल्यानं जास्त दिवसांसाठी मी त्याला सोडून राहू शकत नाही. जेनलचा पाळीव पक्षी टॉकी दोन वर्षांपासून तिच्यासोबत आहे. तेव्हापासूनच त्याला घऱात एकड्याला सोडावं लागू नये, म्हणून त्याची मालकीण सुट्टीलाही गेली नाही. जेनेलनं मागील दोन वर्षात कधीही आउटडोर व्हॅकेशनचा प्लॅन बनवला नाही. याचं कारण टूकन टॉकीच आहे. तिचं म्हणणं आहे, की टॉकी तिच्याशिवाय राहू शकत नाही. तिलादेखील टॉकीपासून दूर जातात डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं वाटतं. ऐकायला अजब वाटत असलं तरीही जेनेलनं टॉकीमुळेच फिरणं बंद केलं आहे. जेनेलचं असं म्हणणं आहे, की टॉकी लहान मुलांप्रमाणेच इकडून तिकडे फिरत राहातो त्यामुळे त्याची काळजी घेणं अधिक गरजेचं आहे. हुश्शार अस्वल! कॅमेरा ऑन करू काढला स्वतःचा VIDEO; रेकॉर्डिंग पाहून व्हाल थक्क जेनेलनं लास आणि गर्लफ्रेंड एली जारुत्स्कीनं वेगासमध्ये एका वाईल्डलाईफ ट्रिपदरम्यान टॉकीला पाहिलं होतं. तेव्हा तो काहीच आठवड्यांचा होता. जून 2019 मध्ये ती टॉकीला आपल्या घरी घेऊन आली. सुरुवातीला तो अतिशय शांत आणि लाजरा होता. त्याला जखमही झालेली होती. या लेसबियन जोडप्यानं दिलेलं प्रेम पाहून टॉकीही त्यांच्यासोबत भरपूर अॅटॅच झाला. आता परिस्थिती अशी आहे, की या दोघांमधील कोणी एकही बाहेर गेलं तरी तो ओरडायला सुरुवात करतो. आपल्या मालकिणी घरी येताच तो पोपटांप्रमाणे ओरडू लागतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या