JOIN US
मराठी बातम्या / Viral / Video : कुत्रा आहे की रॉकेट? बॉल पकडण्यासाठी मारलेली हाय-जम्प पाहून भले-भले चक्रावले!

Video : कुत्रा आहे की रॉकेट? बॉल पकडण्यासाठी मारलेली हाय-जम्प पाहून भले-भले चक्रावले!

या व्हिडिओतील कुत्र्याने एवढी उंच उडी (Dog high jump video) मारली आहे, की ते पाहून मोठमोठे हाय-जम्प खेळाडूही लाजतील.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 20 ऑगस्ट : आपल्या आजूबाजूच्या प्राण्यांमध्ये सगळ्यात समजूतदार पाळीव प्राणी म्हणून कुत्र्याची ओळख आहे. कित्येक वेळा कुत्रं अशी काही कामगिरी करून दाखवतं, ज्यामुळे हीच गोष्ट वारंवार सिद्धही होते. कुत्र्यांना योग्य ट्रेनिंग न देताही ते माणसांना मदत करतात. ट्रेनिंग दिल्यानंतर तर अगदी बॉम्ब शोधण्यापासून सर्व कामं ती करू शकतात. यामुळेच ट्रेनिंगसाठी (Trained Dogs) इतर कोणत्याही प्राण्यांपेक्षा कुत्र्यांची निवड केली जाते. इंटरनेटवर कुत्र्यांच्या कित्येक कारनाम्यांचे व्हिडिओ (Dog training Videos) दररोज अपलोड होत असतात. Malinois.gram या इन्स्टाग्राम अकाउंटवरूनदेखील वाईल्डलाईफ व्हायरल या सीरीजमध्ये असेच आश्चर्यकारक व्हिडिओ (Viral Dog videos) शेअर केले जातात. सध्या यापैकी एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. या व्हिडिओतील कुत्र्याने एवढी उंच उडी (Dog high jump video) मारली आहे, की ते पाहून मोठमोठे हाय-जम्प खेळाडूही लाजतील. हवेत फेकलेला चेंडू हवेतच पकडण्यासाठी कुत्र्याने मारलेली उडी (Dog high jump) पाहून लाखो नेटिझन्स चकित झाले आहेत. बॉल पकडण्यासाठी हाय-जम्प या व्हिडिओमध्ये पाहू शकता, की एक व्यक्ती आपल्या हातातील बॉल हवेत उंच फेकते. तर, दुसरी व्यक्ती खाली वाकून उभी आहे. व्हिडिओचा स्टार असलेला कुत्रा धावत येऊन वाकलेल्या व्यक्तीच्या पाठीचा आधार घेत हवेत उंच (Dog Jumps to catch ball) उसळी घेतो; आणि हवेतला बॉल तोंडात पकडून खाली येतो. या व्हिडिओला पाच लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत, आणि हजारोंच्या संख्येने लोक यावर कमेंट्स आणि शेअर करत आहेत. ट्रेनिंग आणि मेहनतीचं फळ या कुत्र्याला अशा प्रकारे उडी मारण्याचं ट्रेनिंग दिलं गेलं आहे, हे तर व्हिडिओ पाहूनच तुम्हाला लक्षात येईल. व्हिडिओमध्ये असणाऱ्या दोन व्यक्ती त्याचे ट्रेनर असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. अर्थात, या कुत्र्याच्या कामगिरीचं श्रेय पूर्णपणे त्याच्या ट्रेनिंगला (Trained Dog videos) नाही, तर त्याच्या मेहनतीलाही जातं. कारण केवळ प्रशिक्षणामुळे एखादी गोष्ट साध्य होणं शक्य नाही, सोबतच कुत्र्यानेदेखील भरपूर मेहनत घेणं गरजेचं आहे. हीच मेहनत या कुत्र्याने घेतल्याचं या व्हिडिओत दिसून येतं. कुत्र्याची मांजराशी अशी करून दिली ओळख, या VIDEO चा सोशल मीडियावर धुमाकूळ!

संबंधित बातम्या

इंटरनेटवर हा व्हिडिओ भरपूर व्हायरल (Viral dog video) होत आहे. हाय जम्प करणाऱ्या या कुत्र्याला पाहून त्याचं कौतुक करत आहेत. सोबतच त्याच्यासाठी काळजीही व्यक्त करत आहेत. व्हिडिओमध्ये हा कुत्रा खाली गवतात उतरताना दिसतोय. तर, त्याऐवजी खाली गादी किंवा मॅट ठेवण्याचा सल्ला लोक कमेंट्समध्ये देत आहेत. आपल्या आजूबाजूच्या प्राण्यांमध्ये सगळ्यात समजूतदार पाळीव प्राणी म्हणून कुत्र्याची ओळख आहे. कित्येक वेळा कुत्रं अशी काही कामगिरी करून दाखवतं, ज्यामुळे हीच गोष्ट वारंवार सिद्धही होते. कुत्र्यांना योग्य ट्रेनिंग न देताही ते माणसांना मदत करतात. ट्रेनिंग दिल्यानंतर तर अगदी बॉम्ब शोधण्यापासून सर्व कामं ती करू शकतात. यामुळेच ट्रेनिंगसाठी (Trained Dogs) इतर कोणत्याही प्राण्यांपेक्षा कुत्र्यांची निवड केली जाते. इंटरनेटवर कुत्र्यांच्या कित्येक कारनाम्यांचे व्हिडिओ (Dog training Videos) दररोज अपलोड होत असतात. Malinois.gram या इन्स्टाग्राम अकाउंटवरूनदेखील वाईल्डलाईफ व्हायरल या सीरीजमध्ये असेच आश्चर्यकारक व्हिडिओ (Viral Dog videos) शेअर केले जातात. सध्या यापैकी एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. या व्हिडिओतील कुत्र्याने एवढी उंच उडी (Dog high jump video) मारली आहे, की ते पाहून मोठमोठे हाय-जम्प खेळाडूही लाजतील. हवेत फेकलेला चेंडू हवेतच पकडण्यासाठी कुत्र्याने मारलेली उडी (Dog high jump) पाहून लाखो नेटिझन्स चकित झाले आहेत. बॉल पकडण्यासाठी हाय-जम्प या व्हिडिओमध्ये पाहू शकता, की एक व्यक्ती आपल्या हातातील बॉल हवेत उंच फेकते. तर, दुसरी व्यक्ती खाली वाकून उभी आहे. व्हिडिओचा स्टार असलेला कुत्रा धावत येऊन वाकलेल्या व्यक्तीच्या पाठीचा आधार घेत हवेत उंच (Dog Jumps to catch ball) उसळी घेतो; आणि हवेतला बॉल तोंडात पकडून खाली येतो. या व्हिडिओला पाच लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत, आणि हजारोंच्या संख्येने लोक यावर कमेंट्स आणि शेअर करत आहेत. ट्रेनिंग आणि मेहनतीचं फळ या कुत्र्याला अशा प्रकारे उडी मारण्याचं ट्रेनिंग दिलं गेलं आहे, हे तर व्हिडिओ पाहूनच तुम्हाला लक्षात येईल. व्हिडिओमध्ये असणाऱ्या दोन व्यक्ती त्याचे ट्रेनर असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. अर्थात, या कुत्र्याच्या कामगिरीचं श्रेय पूर्णपणे त्याच्या ट्रेनिंगला (Trained Dog videos) नाही, तर त्याच्या मेहनतीलाही जातं. कारण केवळ प्रशिक्षणामुळे एखादी गोष्ट साध्य होणं शक्य नाही, सोबतच कुत्र्यानेदेखील भरपूर मेहनत घेणं गरजेचं आहे. हीच मेहनत या कुत्र्याने घेतल्याचं या व्हिडिओत दिसून येतं. इंटरनेटवर हा व्हिडिओ भरपूर व्हायरल (Viral dog video) होत आहे. हाय जम्प करणाऱ्या या कुत्र्याला पाहून त्याचं कौतुक करत आहेत. सोबतच त्याच्यासाठी काळजीही व्यक्त करत आहेत. व्हिडिओमध्ये हा कुत्रा खाली गवतात उतरताना दिसतोय. तर, त्याऐवजी खाली गादी किंवा मॅट ठेवण्याचा सल्ला लोक कमेंट्समध्ये देत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या