मराठी बातम्या /बातम्या /Viral /

कुत्र्याची मांजराशी अशी करून दिली ओळख, या VIDEO चा सोशल मीडियावर धुमाकूळ, 7.7 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज!

कुत्र्याची मांजराशी अशी करून दिली ओळख, या VIDEO चा सोशल मीडियावर धुमाकूळ, 7.7 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज!

एका व्हिडिओनं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ (Viral Video) घातलाय. एका वयस्कर व्यक्तीने त्याच्या पाळीव कुत्र्याची शेजारच्या मांजरीसोबत ओळख करून दिल्याचा (Pet Dog Introduced To Neighbourhood Cat) हा व्हिडिओ आहे.

मुंबई, 20 ऑगस्ट : सोशल मीडियावर प्राण्यांच्या व्हिडिओला भरपूर लाईक्स मिळतात. कुत्रे, मांजरी अशा घरातल्या पाळीव प्राण्यांचे तर अनेक तऱ्हेचे व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत असतात. अशाच एका व्हिडिओनं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ (Viral Video) घातलाय. एका वयस्कर व्यक्तीने त्याच्या पाळीव कुत्र्याची शेजारच्या मांजरीसोबत ओळख करून दिल्याचा (Pet Dog Introduced To Neighbourhood Cat) हा व्हिडिओ आहे. कुत्रा आणि मांजरीची ओळख झाल्यानंतर त्यांच्यात मैत्री होतानाचा तो व्हिडिओ एका टिकटॉक युझरनं शेअर केलाय. या व्हिडिओला 7.7 मिलियन व्ह्यूज आणि 1.4 मिलियन लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडिओत एका ज्येष्ठ व्यक्तीनं त्याच्या पाळीव कुत्र्याची शेजारच्याच्या मांजरासोबत ओळख करून दिली आहे. चालता चालता शेजारच्या झुडुपात त्यांना एक मांजर दिसली. व्हिडिओतील व्यक्तीनं त्याच्या कुत्र्याला मांजरीच्या जवळ ठेवलं सुरुवातीला कुत्र्यानं मैत्रीचा एक हात मांजरीपुढे केला. त्यानंतर काही धोका नाही ना याचा अंदाज घेण्यासाठी कुत्रा थोडं मागे आला. त्यानंतर मात्र दोघांची लगेच मैत्री झाली. मांजर व कुत्र्याची ओळख झाल्यावर कुत्र्याच्या मालकानं त्याला खाली ठेवलं व स्वतः मांजरीशी मैत्री करण्यासाठी पुढे झाला. मैत्रीचा हा अनोखा व्हिडिओ Cheyenne या त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका टिकटॉक युझरनं घेतला आहे असं ‘अपवर्दी’नं (Upworthy) म्हटलंय. ही क्लीप ऑनलाईन अपलोड झाल्यावर लगेचच तिला भरपूर व्ह्युज मिळाले. हा व्हिडिओ अपलोड करताना टिकटॉक युझरनं त्याला प्युअर मोमेंट अर्थात निरागस क्षण असं म्हटलंय. “असा गोड क्षण प्रत्यक्षात अनुभवायला मिळाल्यामुळे माझ्या डोळ्यात पाणी आलं. तेव्हापासून माझ्या चेहऱ्यावरचं हसू मावळलेलं नाही.” असंही तिनं यात म्हटलंय. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय. आतापर्यंत 7.7 मिलियन लोकांनी तो पाहिलाय, तर 1.4 मिलियन लाईक्स त्याला मिळाले आहेत. या व्हायरल व्हिडिओला आलेल्या कमेंट्समध्ये व्हिडिओमधील त्या वयस्कर व्यक्तीनंही स्वतःची ओळख सांगितली व कुत्र्याचं नावही सांगितलंय. आपल्या टेड या 4 वर्षांच्या कुत्र्याची याआधी मांजरीशी भेट घडवून आणली होती. त्यामुळे आता दोघांनी पट्कन मैत्री केल्याचं त्या वयस्कर व्यक्तीनं सांगितलंय. आपण स्वतः मांजरीसोबत आधी ओळख करून घेतली व परिस्थितीचा अंदाज घेतला मगच कुत्र्याला पुढे पाठवलं असं ते म्हणालेत. हा व्हिडिओ काढणाऱ्या टिकटॉक (Tiktok) युझरनं त्या वयस्कर व्यक्तीची क्षमाही मागितली आहे. हे कृत्य त्यांना आगंतुकासारखं वाटलं असेल, तर माफी मागते असं तिनं म्हटलंय. तसंच ही क्लीप त्यांच्यापर्यंत पोचल्याबद्दल आभार मानलेत व त्यांच्या कुत्र्याचं कौतुकही केलंय.
First published:

पुढील बातम्या